Price Dropped! OnePlus च्या या स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 13 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा
OnePlus प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर तुम्ही OnePlus 12R स्मार्टफोन मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची या खरेदीवर मोठी बचत होणार आहे. तुमचा स्मार्टफोन खराब झाला असेल आणि तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर OnePlus 12R सध्या सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. Amazon वरून OnePlus 12R खरेदी करण्याची आता तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.
OnePlus 12R स्मार्टफोनच्या खेरदीवर आता ई-कॉमर्स साइट Amazon वर या फोनवर प्रचंड सवलती आणि बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 13 हजार रुपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही इतर गॅझेट्स खरेदी करू शकता. OnePlus 12R मध्ये 6.78-इंचाचा वक्र एज AMOLED डिस्प्ले आहे आणि तो Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामुळे तो एक शक्तिशाली स्मार्टफोन बनतो. OnePlus 12R वर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि डिस्काऊंटबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
OnePlus 12R चा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट आता Amazon वर 32,999 रुपयांना उपलब्ध आहे. OnePlus 12R स्मार्टफोन कंपनीने 42,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांचं फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. शिवाय OnePlus 12R च्या खरेदीवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे देऊन 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 13 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे, ज्यामुळे फोनची किंमत 29,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
जुलै 2024 मध्ये या फोनची लाँच किंमत 42,999 रुपये होती, म्हणजेच आता स्मार्टफोनच्या खरेदीवर 13,000 रुपयांची बचत होत आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत 27,350 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते, परंतु ही सूट स्मार्टफोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असते. तुम्हाला या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे.
OnePlus 12R च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात LTPO कव्हर केलेला डिस्प्ले पॅनल आहे. जे 6.6.78 इंचाच्या LTPO 4.0 AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. चांगल्या परफॉर्मेंससाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. हे डिव्हाइस Android 15 सह येते आणि त्यात अॅक्वा टच टेक्नोलॉजी आहे, ज्यामुळे यूजर ओल्या परिस्थितीतही डिस्प्ले वापरू शकतात
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे, ज्यामध्ये अल्ट्रावाइड आणि मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. याला पॉवर देण्यासाठी, यात 5,500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे ते एक उत्तम आणि फीचर-पॅक डिव्हाइस बनते. या स्मार्टफोनमध्ये अनेक मजेदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे युजर्सना स्मार्टफोन वापरण्याचा अधिक चांगला अनुभव मिळतो.