
OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
कंपनीने शेअर केलेला फोटा बारकाईने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, या आगामी स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरे दिले जाणार आहेत. तर वनप्लस 13R मध्ये ट्रिपल कॅमेरे देण्यात आले होते. कॅमेऱ्याच्या बाजूला एक एलईडी फ्लॅश देखील पाहायला मिळत आहे. वनप्लसने कन्फर्म केलं आहे की, हा फोन आउट ऑफ बॉक्स अँड्रॉइड 16-बेस्ड ऑक्सीजनओएस 16 वर आधारित असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, अपकमिंग वनप्लस 15R मध्ये 6.83-इंचाचा 1.5K 165Hz AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच या फोनला अधिक शक्तिशाली करण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट किंवा स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 5 चिपसेट दिला जाऊ शकतो.
OnePlus 15R officially teased! Launching soon in India 🇮🇳 pic.twitter.com/YK5LYX0wZq — OnePlus Club (@OnePlusClub) November 17, 2025
याशिवाय कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर, 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकेंडरी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 100W किंवा 120W ची SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन 7800mAh किंवा 8000mAh बॅटरीने सुसज्ज असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, कंपनीचा हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. वनप्लस 15R ची विक्री Amazon.in व्यतिरिक्त वनप्लस इंडियाचे ऑनलाइन स्टोर आणि ऑफलाइन स्टोर्सवर देखील होणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत कंपनी स्मार्टफोनची लाँच डेट आणि इतर डिटेल्स शेअर करण्याची शक्यता आहे.
Ans: जड गेमिंग किंवा उष्ण वातावरणात थोडे गरम होऊ शकतात, पण कूलिंग सिस्टीम चांगली असते.
Ans: होय, OnePlus Watch, OnePlus Buds, Buds Pro, Bullets इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत.
Ans: फ्लॅगशिप मॉडेल्सना IP68 रेटिंग असते, पण सर्व Nord मॉडेल्स वॉटरप्रूफ नसतात.