
OnePlus 15R: तो लवकरच येतोय... टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स
इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
OnePlus 15R भारताच लाँच होण्यापूर्वीच त्याच्या परफॉर्मेंस, सॉफ्टवेयर आणि ड्यूरेबिलिटीबद्दल सांगण्यात आलं आहे. याशिवाय या स्मार्टफोनची लाँच डेट काय असणार आहे, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय असणार आहेत आणि हा स्मार्टफोन भारतात कोणत्या प्राईज रेंजमध्ये लाँच केला जाणार आहे, याबाबत देखील माहिती समोर आली आहे. आगामी स्मार्टफोनबाबत सर्व माहिती आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
For @ArmaanMalik22 , reinvention isn’t pressure – it’s purpose. #PowerOnLimitsOff pic.twitter.com/j2Sz3pnLe4 — OnePlus India (@OnePlus_IN) December 6, 2025
OnePlus 15R हा स्मार्टफोन भारतात 17 डिसेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या स्मार्टफोनच्या लाँचिंगवेळी कंपनी OnePlus Pad Go 2 सादर करणार आहे. कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन अॅमेझॉन, वनप्लस ई-स्टोर, रिटेल चॅनल पार्टनर्स आणि OnePlus स्टोर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
आगामी स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील लाँचिंगपूर्वीच समोर आले आहेत. OnePlus 15R या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच AMOLED पॅनल दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 165Hz रिफ्रेश रेट असण्याची शक्यता आहे. या आगामी डिव्हाईसमध्ये Snapdragon 8 Gen 5 चिपसेट दिला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
हे डिव्हाईस Android 16-बेस्ड ColorOS 6 वर आधारित असणार आहे. OnePlus 15R मध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह इंडस्ट्री-फर्स्ट 8,300mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, हे डिव्हाईस OIS सह 50MP मुख्य सेंसर आणि 8MP अल्ट्रावाइड सेंसरसह डेब्यू करू शकते. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. डिव्हाईस IP66, IP68, किंवा IP69k रेटिंगसह लाँच केले जाऊ शकते.
OnePlus 15R भारतात 45,000 रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही.
Ans: OnePlus सहसा वर्षातून 2–3 मोठी लॉन्च इव्हेंट्स ठेवते. फ्लॅगशिप सिरीज Q1 मध्ये आणि “R/Nord” सिरीज मध्यम वर्षात येते.
Ans: OnePlus फोन Amazon, OnePlus Store अॅप, OnePlus Experience Stores आणि अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतात.
Ans: OnePlus कडे देशभर अधिकृत सर्विस सेंटर्स आहेत. Repair, Battery, Screen बदलणे, Software issues सर्व त्याठिकाणी केले जातात.