इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
Mashable ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, Beeple ने सादर केलेल्या या कलेचा उद्देश असा आहे की, आज तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश समाजावर कसा प्रभाव पाडत आहेत आणि लोकांच्या मतांना कशा पद्धतीने आकार देत आहेत हे लोकांना समजले पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की, यापूर्वी कलाकार समाजातील विचार आणि लोकांची समज यावर मोठा प्रभाव टाकत होते. मात्र आता फेसबूक, इंस्टाग्राम, एक्स सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लोकांच्या विचारावर परिणाम होत आहे. (फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डॉग्स सर्वत्र फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांना हे दृष्ट अतिशय भितीदायक आणि विचित्र वाटले. व्हिडीओमधील एका भागात हे रोबोट डॉग पाठीमागे वाकून एक प्रिंट तयार करत असल्याचे दिसत आहे. यावेळी रोबोट डॉगच्या पाठीवर पुप मोड असं देखील लिहीलं होतं. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर यूजर्सनी अनेक मजेदार कमेंट केल्या आहेत.
IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
या कलेचा खरा उद्देश Beeple ने सांगितला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, आधीच्या काळात जगाला समजण्यासाठी आणि अनुभव करण्यासाठी कलाकार सर्वात महत्त्वाचा मार्ग होते, ज्यामध्ये पिकासो, वॉरहॉल, आणि अनेकांचा समावेश होता. मात्र आता हे काम तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधिशांनी हाती घेतले आहे. यामध्ये विशेष सहभाग मार्क झुकरबर्ग आणि एलन मस्क यांचा आहे. Beeple च्या मते, या अल्गोरिदमचे नियंत्रण इतके मोठे झाले आहे की सामान्य लोक नकळतपणे त्यांच्या डोळ्यांनी जग पाहू लागले आहेत. म्हणूनच प्रदर्शनात पिकासो आणि अँडी वॉरहोल यांना रोबोट डॉगमध्ये देखील बनवण्यात आले होते. Beeple ने सांगितलं की, लोकं आता जगाकडे AI आणि रोबोटिक्स नजरेने पाहत आहे. येणाऱ्या काळात हा बदल अधिक वाढणार आहे.






