
OnePlus Freedom Sale: अशी डील पुन्हा येणार नाही! स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 8 हजारांचे डिस्काऊंट, टॅबलेट्स आणि ईअरबड्सवरही ऑफर्स...
वनप्लस फ्रीडम सेल 2026 हा 16 जानेवारी 2026 पासून सुरु होणार आहे. हा सेल ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा सेल उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोन अॅमेझॉन, वनप्लस.इन, वनप्लस एक्सपेरिअंस स्टोअर्स आणि रिलायंस डिजीटल, क्रोमा, विजय सेल्स, सारख्या मोठ्या रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे. वनप्लस टॅबलेट फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे, तर ऑडियो प्रोडक्ट्स फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, मिंत्रा, ब्लिकिंट आणि इत्यादी अधिकृत पार्टनर्सद्वारे खरेदी केले जाऊ शकतात.(फोटो सौजन्य – Pinterest)
सेलदरम्यान सर्वात जास्त फायदा OnePlus 13 च्या खरेदीवर मिळणार आहे. हा स्मार्टफोन 69,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र फ्रीडम सेलमध्ये या स्मार्टफोनच्या खरेदीवर 8,000 रुपयांचे थेट डिस्काऊंट मिळणार आहे. तर ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांचे अतिरिक्त बँक डिस्काऊंट देखील मिळणार आहे. उपलब्ध ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर OnePlus 13 ची किंमत 57,999 रुपये होणार आहे. हा फोन Hasselblad ब्रँडिंगसह येणारा OnePlus चा शेवटचा फ्लॅगशिप असल्याचे म्हटलं जात आहे. यामध्ये अलर्ट स्लाइडर, मेटल फ्रेम आणि सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल सारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
नवीन OnePlus 15 सीरीज देखील या सेलचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. OnePlus 15 स्मार्टफोन 72,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र सेलमध्ये या डिव्हाईसवर 4 हजार रुपयांची इंस्टेट डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत सेलमध्ये 68,999 रुपये असणार आहे. तसेच या डिव्हाईसच्या खरेदीवर 6 महीन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय आणि OnePlus Nord Buds 3 देखील फ्री दिले जाणार आहेत. OnePlus 15R च्या खरेदीवर देखील सेलमध्ये मोठं डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 47,999 रुपये आहे. मात्र यावर 3,000 रुपयांचे बँक डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत 44,999 रुपये असणार आहे.
OnePlus Pad 2 च्या खरेदीवर 2,000 रुपयांचे बँक मिळणार आहे. या डिस्काऊंटनंतर टॅब्लेटची किंमत 34,999 रुपये होणार आहे. तर 3,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह OnePlus Pad 3 ची किंमत 44,999 रुपये असणार आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर Stylo 2 फ्री मिळणार आहे. 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट आणि 2 हजार रुपयांच्या बँक डिस्काऊंटनंतर OnePlus Pad Go 2 ची किंमत 23,999 रुपये होणार आहे. फ्रीडम सेलमध्ये ऑडियो प्रोडक्ट्स देखील मोठं डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर OnePlus Buds 4 ची किंमत 4,999 रुपये, OnePlus Buds Pro 3 ची किंमत 9,999 रुपये होणार आहे.
Ans: OnePlus Freedom Sale मर्यादित कालावधीसाठी सुरू असून ठराविक तारखेपर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध आहे.
Ans: OnePlus चे स्मार्टफोन, टॅबलेट्स, ईअरबड्स आणि अॅक्सेसरीज वर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत.
Ans: ही सेल OnePlus India ची अधिकृत वेबसाईट, Amazon आणि Flipkart वर उपलब्ध आहे (प्लॅटफॉर्मनुसार ऑफर बदलू शकते)