केवळ एक्सपर्ट्सना माहिती आहेत या 4 स्मार्टफोन ट्रिक्स, Over Heating ची समस्या चुटकीसरशी होईल दूर
आजच्या डिजिटल आणि वेगाने प्रगती करणाऱ्या जगात स्मार्टफोनशिवाय जगणं एक मोठं आव्हान आहे. स्मार्टफोन एक असं डिव्हाईस आहे ज्याच्या मदतीने आपण कोणतीही कामं अगदी सहज करू शकतो. गेमिंग, चॅटिंग, कॉलिंग, शॉपिंग, पेमेंट ही सर्व कामं स्मार्टफोनच्या मदतीने केली जाऊ शकतात. पण सततच्या वापरामुळे आपला स्मार्टफोन गरम होतो, ज्यामुळे ब्लास्ट होण्याची देखील शक्यता असते. तुमचाही स्मार्टफोन जर सतत गरम होत असेल तर या लेखात दिलेल्या टिप्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहेत. तुमचा फोन जर ओव्हरहीट होत असेल तर एक्सपर्टच्या या टिप्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहेत.
नेटवर्क सिग्नल कमी असल्यास स्मार्टफोन जास्त पावर वापरते. नेटवर्क डिव्हाईसला कनेक्ट ठेवण्यासाठी स्मार्टफोनला जास्त मेहनत करावी लागते आणि अशा परिस्थितीत फोन ओव्हरहीट होतो. जर तुमच्या फोनला नेटवर्क कमकुवत असेल तर फोनचा फ्लाईट मोड ऑन करा आणि पुन्हा बंद करा. यामुळे केवळ स्मार्टफोनचं नेटवर्कच चांगलं होणार नाही तर स्मार्टफोनवरील भार देखील कमी होणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधे कूल दिसण्यासाठी लाईव्ह किंवा ॲनिमेटेड वॉलपेपरचा वापर करत असाल तर यामुळे फोन गरम होऊ शकतो. अशा वॉलपेपरमुळे विजुअल सीपीयू आणि रॅम सतत ॲक्टिव्ह राहतात आणि स्मार्टफोनमध्ये ओव्हरहीटची समस्या निर्माण होते. शिवाय अशा वॉलपेपरमुळे स्मार्टफोनची बॅटरी देखील लवकर संपते. यामुळे आपल्या स्मार्टफोनसाठी साध्या आणि सिंपल वॉलपेपरची निवड करा. यामुळे स्मार्टफोन गरम होणार नाही शिवाय बॅटरीची देखील बचत होईल.
जर तुम्ही फोनची स्पीड वाढवण्यासाठी थर्ड पार्टी क्लीनर ॲप्सचा वापर करत असला तर यामुळे स्मार्टफोन गरम होतो. असे थर्ड पार्टी ॲप सतत बॅकग्राउंडमध्ये कॅशे क्लियर करते त्यामुळे रॅम आणि सीपीयू ॲक्टिव राहतात आणि फोनमध्ये ओव्हरहीटची समस्या निर्माण होते.
Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा पावरफुल, पण फोटो मात्र बेकार; या 5 सेटिंग्ज करणार तुमची मदत
जर तुम्ही तुमच्या फोनवरून वाय-फाय हॉटस्पॉटद्वारे इंटरनेट शेअर करून लॅपटॉप वापरत असाल, तर हॉटस्पॉट सतत चालू असल्याने तुमचा फोन जास्त गरम होऊ शकतो, परंतु जर तुम्ही हॉटस्पॉटऐवजी यूएसबी टिथरिंगचा वापतर केला, तर तुम्ही तुमचा फोन बर्याच प्रमाणात गरम होण्यापासून वाचवू शकता आणि स्थिर इंटरनेट स्पीडचा आनंद देखील घेऊ शकता. यूएसबी टेदरिंग वाय-फाय हॉटस्पॉटपेक्षा कमी हिट निर्माण करते, ज्यामुळे फोनमध्ये ओव्हरहीटची समस्या निर्माण होत नाही.