Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI ने खरेदी केला नवीन डोमेन! 126 करोड रुपयांना फायनल झाली डील, काय आहे खासियत? जाणून घ्या सविस्तर

भारतीय वंशाच्या धर्मेश शाह यांनी chat.com डोमेन OpenAI ला विकलं आहे. हा व्यवहार 15 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच 126 करोड रुपयांना फायनल झाला आहे. chat.com डोमेनबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2024 | 11:00 AM
OpenAI ने खरेदी केला नवीन डोमेन! 126 करोड रुपयांना फायनल झाली डील, काय आहे खासियत? जाणून घ्या सविस्तर

OpenAI ने खरेदी केला नवीन डोमेन! 126 करोड रुपयांना फायनल झाली डील, काय आहे खासियत? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

काही दिवसांपूर्वी JioHotstar डोमेनबाबत इंटरनेटवर बरीच चर्चा झाली होती. डोमेचा खरा मालक कोण, याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. ॲप डेव्हलपरने रिलायन्सला पत्र लिहीत डोमेन विक्रीसाठी पैशांची मागणी केली होती. त्यानंतर एका भावा- बहिणीने या डोमेनचा मालक असल्याचा दावा केला होता. JioHotstar डोमेनची सोशल मिडीयावर चर्चा सुरु असतानाच आता चॅटजीपीटी तयार करणाऱ्या कंपनी OpenAI ने नवीन डोमेन खरेदी केलं आहे. 126 कोटी रुपयांना हा व्यवहार पूर्ण झाला असून OpenAI ने खरेदी केलेल्या या डोमेनची सध्या चर्चा सुरु आहे.

हेदेखील वाचा- मोबाईल युजर्स इकडे लक्ष द्या! फ्रॉडर्सने शोधला फसवणुकीचा नवीन मार्ग, TRAI ने जारी केली वॉर्निंग

हे डोमेन विकणारी व्यक्ती भारतीय वंशाची धर्मेश शाह आहे. धर्मेश शाह HubSpot चे सह-संस्थापक आणि CTO देखील आहे. या डोमेनमध्ये असे काय आहे ज्यासाठी OpenAI ने करोडो रुपये देण्याचे मान्य केले, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

126 कोटी रुपयांना डील फायनल

भारतीय वंशाच्या धर्मेश शाह यांनी स्वतः chat.com डोमेनबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, हे डोमेन विकत घेण्यासाठी OpenAI ने 15 मिलीयन यूएस डॉलर्स म्हणजेच 126 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम भरली आहे.

डोमेनची खासियत आहे तरी काय ?

अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की, या डोमेनमध्ये एवढे विशेष काय आहे की त्यासाठी धर्मेश शाह यांना OpenAI ने करोडो रुपये दिले. याची अनेक कारणे आहेत. पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे chat.com डोमेन फार जुनं आहे, त्यामुळे त्याची विश्वासार्हता गुगलच्या नजरेत कायम आहे. या डोमेनची नोंदणी 1996 मध्ये झाली. म्हणजे डोमेन सुमारे 28 वर्षांचे आहे. दुसरे म्हणजे, त्याचे साधे नाव त्याला खास बनवते. साधे, जुने आणि लक्षात ठेवण्यास सोपे डोमेन सहसा जास्त किंमत देतात.

ओपनएआयचं उद्दिष्ट काय?

शहा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर या डोमेनच्या विक्रीची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, chat.com हे एक उत्तम डोमेन आहे आणि ते प्रोडक्ट यशस्वी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हा करार 15 मिलियन अमेरिकी डॉलरमध्ये पूर्ण झाला आहे. हे डोमेन खरेदी करण्यामागील OpenAI चा उद्देश त्याच्या सेवा जास्तीत जास्त लोकांना सहज उपलब्ध करून देणे हा आहे. कंपनीला तिच्या सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत उपलब्ध व्हाव्यात असे वाटते. या करारावर बराच काळ बोलणी सुरू होती आणि आता हा करार फायनल झाला आहे.

BREAKING NEWS: Secret acquirer of $15+ million domain chat .com revealed and it’s exactly who you’d think. For those of you that have been following me for a while, you may recall that I announced earlier this year that I had acquired the domain chat .com for an “8 figure sum”… https://t.co/nv1IyddP5z — dharmesh (@dharmesh) November 6, 2024

हेदेखील वाचा- Jio Recharge Plans: जिओचे दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरंच काही

व्हॅनिटी डोमेनची वाढती लोकप्रियता

Chat.com हे एक अतिशय लहान नाव आहे आणि ते लक्षात ठेवण्यास सोपे आहे. या प्रकारच्या डोमेनला “व्हॅनिटी डोमेन” म्हणतात. आजकाल व्हॅनिटी डोमेनची लोकप्रियता खूप वाढत आहे. व्हॅनिटी डोमेन एखादी व्यक्ती किंवा ब्रँडच्या नावाने ओळखले जाते. हे एक सानुकूल डोमेन नाव आहे जे लक्षात ठेवणे सोपे आहे. या प्रकारच्या डोमेनना कस्टम URL किंवा ब्रँडेड URL देखील म्हणतात.

Web Title: Openai buy new domain from dharmesh shah deal finale for rupees 126 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 11:00 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
1

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
2

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
3

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
4

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.