Jio Recharge Plans: जिओचे दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरंच काही
सध्याच्या काळात परवडणारे रिचार्ज प्लॅन शोधणे हे वापरकर्त्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. विशेषत: टॅरिफ वाढल्यानंतर युजर्स पैसे वाचवण्यासाठी सिम बदलत आहेत. काही प्लॅन वगळता, सर्वांच्या किंमती जास्त आणि फायदे कमी आहेत. आता आम्ही तुम्हाला जिओच्या दोन अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे युजर्ससाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतात. पहिल्या रिचार्ज प्लॅनची किंमत 198 रुपये आहे तर दुसऱ्याची किंमत 949 रुपये आहे.
हेदेखील वाचा- Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो करा या स्टेप्स
इतर कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन जरी महाग वाटत असले तरी देखील त्यांचे फायदे अनेक आहेत. शिवाय कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक प्लॅन आहेत, जे दीर्घकाळासाठी डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा देतात. जर तुम्ही असा प्लान शोधत असाल जो स्वस्त असेल आणि त्याचे फायदे देखील असतील, अशाच दोन प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारखे फायदे तुम्हाला दिर्घकाळापर्यंत मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
रिलायन्स जिओच्या 198 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 जीबी डेटा 14 दिवसांसाठी रोलआउट केला जातो. तुम्ही दररोज 2 GB डेटाचा आनंद घेऊ शकता. याची व्हॅलिडीट 14 दिवस असली तरी कंपनी यामध्ये चांगला डेटा ऑफर करत आहे. 2 जीबी डेटा व्यतिरिक्त, प्लॅन कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा देखील प्रदान करते. कॉलिंग फायदे स्थानिक आणि एसटीडी कुठेही मिळू शकतात. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.
या प्लॅनमध्ये कोणत्याही ॲपचे सबस्क्रिप्शन दिले जात नाही. या प्लॅनची चांगली गोष्ट म्हणजे दैनंदिन डेटा पॅक संपल्यानंतर तुम्हाला अमर्यादित 5G डेटा ऍक्सेस करण्याची सुविधा मिळते. मात्र, ही सेवा फक्त त्या भागात उपलब्ध असेल जिथे कंपनीची 5G सेवा उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: गुगल मॅप युजर्ससाठी महत्त्वाची टीप! लोकेशन हिस्ट्री, सर्च रिजल्ट अशा पद्धतीने करा डिलीट
Jio च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि सर्व नेटवर्कवर फ्री इंटरनॅशनल रोमिंग 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 2GB हायस्पीड डेटा ऑफर केला जातो. जर दैनंदिन डेटा पॅक संपला असेल तर अनलिमिटेड 5G इंटरनेटचा आनंद घेता येईल. या प्लॅनमध्ये 100 एसएमएस पाठवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. शेवटी, OTT बद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लान Rs 949 मध्ये Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो.
BSNL देखील Jio च्या प्लॅन प्रमाणेच प्रीपेड प्लॅन ऑफर करते. यामध्ये, 84 दिवसांऐवजी, व्हॅलिडीटी 160 दिवस म्हणजे 5 महिन्यांपेक्षा जास्त आहे. प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणला जातो. अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस पाठवणे उपलब्ध आहेत. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यात जिओच्या तुलनेत जवळपास समान फायद्यांसह अधिक दिवसांची व्हॅलिडीटी आहे.