आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक
Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
कंपनीने अधिकृतपणे सांगितलं आहे की, त्यांच्या डेब्यू स्मार्टफोनचे नाव ‘Mivi One 5G’ असणार आहे. नावावरून स्पष्ट होत आहे की, हा आगामी स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह लाँच केला जाणार आहे. तसेच या स्मार्टफोनच्या प्रोसेसरबाबत देखील काही संकेत देण्यात आले आहेत. फ्लिपकार्टवर स्मार्टफोनचे डेडिकेटेड लँडिंग पेज लाईव्ह झाले आहे, ज्यामुळे स्मार्टफोनची डिझाईन आणि त्याच्या रंग पर्यायांचा खुलासा होत आहे. (फोटो सौजन्य: flipkart)
फ्लिपकार्ट मायक्रोसाईटवरून असा अंदाज लावला जात आहे की, मिवी वन 5G हा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. अद्याप कंपनीने या स्मार्टफोनची लाँच डेट जाहिर केली नाही. मात्र फ्लिपकार्टवर शेअर करण्यात आलेल्या लँडिंग पेजवरून स्पष्ट होत आहे की, फोन 5G कनेक्टिविटीसह दाखल होणार आहे आणि यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 5G चिपसेट मिळणार आहे. कंपनीने प्रोसेसरचे अचूक मॉडेल अद्याप जाहिर केले नाही.
मिवी वन 5G राउंडेड कॉर्नर्स असलेल्या ग्रीन कलर ऑप्शनमध्ये पाहायला मिळत आहे. हा स्मार्टफोन प्रिटी पावरफुल या टॅगलाईनसह टिझ करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कंपनी त्यांच्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा करु शकते, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. अलीकडेच समोर आलेल्या लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मिवी वन 5G भारतात 15 हजारांहून कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.
खरं तर, मिवी एक लोकप्रिय ऑडिओ ब्रँड आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच ईयरफोन्स, साउंडबार, ब्लूटूथ स्पीकर्स, होम थिएटर सिस्टम आणि अनेक ऑडियो प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. आता कंपनी स्मार्टफोन बाजारात एंट्री करणार आहे. येत्या काही दिवसांत कंपनीचा पहिला स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.






