Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra’ लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स

OpenAI GPT-6 Astra: ओपनएआयने नवीन एआय मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडेल सर्वात शक्तिशाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अद्याप हे मॉडेल सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले नाही. या मॉडेलमध्ये यूजर्सना कोणते खास फीचर्स मिळणार, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2026 | 09:07 AM
OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra' लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स

OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra' लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • जीपीटी-6 अस्त्रा ची एंट्री: ओपनएआयने अनेक वर्षांच्या ट्रेनिंग आणि संशोधनानंतर जीपीटी-6 अस्त्रा हे नवे एआय मॉडेल सादर केल्याचा दावा केला आहे.
  • अनेक क्षेत्रांत दमदार कामगिरी: कॉम्प्युटर वापर, ब्राउजिंग, कोडिंग, सायबर सिक्युरिटी आणि विज्ञान क्षेत्रातील प्रोफेशनल कामांसाठी हे मॉडेल अधिक सक्षम असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • पेड यूजर्सना मिळणार प्रवेश: सुरुवातीला निवडक यूजर्सना उपलब्ध असलेले मॉडेल पुढे चॅटजीपीटी गो, चॅटजीपीटी प्लस, प्रो, बिझनेस आणि एंटरप्राइज यूजर्ससाठी आणले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
OpenAI: टेकजायंट कंपनी ओपनएआयने चॅटजीपीटीचे लेटेस्ट एआय मॉडल रिलीज केले आहे. नवीन एआय मॉडेल GPT-6 Astra या नावाने जगासमोर सादर करण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे नवीन चॅटजीपीटी मॉडेल जगातील सर्वात बुद्धिमान आणि संरेखित (अलाइन्ड) मॉडेल आहे. हे नवीन मॉडेल रिलीज करताना कंपनीने सांगितलं आहे की, अनेक वर्षांपासून सुरु असलेली ट्रेनिंग आणि कष्टानंतर हे नवीन एआय मॉडेल सादर करण्यात आले आहे. ओपनएआयचं म्हणणं आहे की, जीपीटी-6 अस्त्रामध्ये प्री-ट्रेनिंग, रीइन्फोर्समेंट लर्निंग आणि अलाइनमेंट या क्षेत्रांतील त्यांचे अनेक वर्षांचे संशोधन आणि प्रचंड प्रयत्नांचा समावेश आहे

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक

ओपनएआने काय म्हटलं?

जीपीटी-6 अस्त्रा सादर करताना टेक कंपनी ओपनएआने म्हटलं की, हे नवीन मॉडेल कंप्युटरचा वापर, ब्राउजिंग, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, सायबर सिक्योरिटीसह विज्ञान आणि दुसऱ्या प्रोफेशनल कामांमध्ये आतापर्यंतचे जगातील सर्वात ॲडव्हांस मॉडेल मानले जात आहे. नवीन चॅटजीपीटी मॉडेल अस्त्राबाबत असा दावा करण्यात आला आहे की, या मॉडेलने फ्रंटियरमॅथ टियर 4 मध्ये 98% गुण मिळवले आहेत. यासोबतच, हे मॉडेल गणितात दिर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी देखील मदत करू शकते. तसेच, चॅटजीपीटीच्या लेटेस्ट मॉडेलने एआरसी-एजीआय-3 मध्ये 99.9 टक्के आणि एक्सप्लॉइटबेंचमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत.  (फोटो सौजन्य: X) 

GPT-6 Astra is the most intelligent and aligned model in the world, and sets a new state of the art for computer use, browsing, software engineering, cybersecurity, science, and professional work. https://t.co/BxTEtJlwLP — OpenAI (@OpenAI) September 3, 2026

स्मार्ट पद्धतीने काम करण्यासाठी सक्षम

ओपनएआयचं असं म्हणणं आहे की, त्यांचे लेटेस्ट जीपीटी-6 अस्त्रा मॉडेल कंप्यूटर आणि ब्राउजरवर अगदी नवीन आणि स्मार्ट पद्धतीने काम करण्यासाठी सक्षम आहे. यासोबतच, प्रोफेशनल काम देखील वेगाने आणि अचुकतेने पूर्ण केली जाऊ शकतात. तसेच, या मॉडेलद्वारे मिळाणाऱ्या निकालातून मागील मॉडेल्सपेक्षा कमी चुका होण्याची शक्यता आहे.

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

या यूजर्सना मिळणार नवं मॉडेल वापरण्याची संधी

ओपनएआयने लेटेस्ट वर्जन लाँच करताना त्याच्या उपलब्धतेबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे. जीपीटी-6 अस्त्रा मॉडेल सध्या निवडक यूजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, येणाऱ्या काळात हे मॉडेल सर्व पेड यूजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे. ज्यामध्ये चॅटजीपीटी गो, चॅटजीपीटी प्लस, प्रो, बिझनेस आणि एंटरप्राइज सब्सक्रिप्शन वाले यूजर्सचा समावेश असणार आहे. यासोबतच, हे सबस्क्राइबर्ससाठी ओपनएआई एपीआई, माइक्रोसॉफ्ट एज्योर आणि एडब्ल्यूएस बेडरॉक द्वारे उपलब्ध करून दिले जाईल.

Web Title: Openai gpt 6 astra launch new ai model advanced computer use browsing coding cybersecurity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • openai

संबंधित बातम्या

23 हजार तरुणांसाठी मोठी संधी! DELL चा ‘उडान’ उपक्रम, AIपासून रोजगारापर्यंत मिळणार प्रशिक्षण
1

23 हजार तरुणांसाठी मोठी संधी! DELL चा ‘उडान’ उपक्रम, AIपासून रोजगारापर्यंत मिळणार प्रशिक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.