
Oppo A6c: 6,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट... नव्या बजेट स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Oppo A6c स्मार्टफोन चीनमध्ये एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या सिंगल व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 799 म्हणजेच सुमारे 11 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑर्किड पर्पल आणि ऑलिव ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून Oppo ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायंच झालं तर Oppo A6c डिव्हाईसमध्ये 6.75-इंच HD+ फ्लॅट LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील आहे. हे डिव्हाईस 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि नेचुरल मोडमध्ये फुल sRGB कवरेज देखील ऑफर करते. फोनमध्ये 800 निट्स पर्यंत ब्राइटनेस देखील आहे.
परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर Oppo A6c मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट आहे, ज्यासोबतच एड्रेनो 610 GPU आहे. डिव्हाईस 6GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजने सुसज्ज आहे. फोनची स्टोरेज मेमरी कार्डद्वारे देखील वाढवता येते. हे डिव्हाइस अँड्रॉइड 15 -आधारित कलरओएस 15 वर चालते. फोटोग्राफीसाठी Oppo A6c मध्ये f/2.2 अपर्चर आणि ऑटोफोकस सह 13-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच हे डिव्हाईस 10x पर्यंत डिजिटल झूमला देखील सपोर्ट करते. समोरील बाजूला फोनमध्ये f/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 6,500mAh बॅटरी आहे मात्र फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही.