
Oppo A6s 5G vs Vivo T5x: 20 हजार रुपयांत कोण ऑफर करणार दमदार फीचर्स? बॅटरीपासून किंमतीपर्यंत... वाचा संपूर्ण तुलना
Oppo A6s 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर या डिव्हाईसच्या 6GB रॅम व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आहे. दुसरीकडे, Vivo T5x स्मार्टफोनच्या 6GB रॅम असलेल्या बेस व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. रॅमच्या बाबतीत Vivo T5x जास्त दमदार मानला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Oppo A6s 5G मध्ये 6.75 इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या किंमतीमध्ये असे अनेक स्मार्टफोन्स आहेत जे FHD+ स्क्रीन ऑफर करतात. यामुळे ओप्पो स्मार्टफोनमधील डिस्प्ले थोडा कमकुवत मानला जाऊ शकतो. Vivo T5x मध्ये 6.76 इंच FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 निट्स ब्राइटनेस ऑफर करतो. हा स्मार्टफोन व्हिडीओ आणि गेमिंहसाठी अधिक चांगला मानला जातो.
Oppo A6s 5G मध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो रोजच्या वापरासाठी, सोशल मीडिया आणि गेमिंगसाठी योग्य मानला जातो. तर Vivo T5x मध्ये डेमेन्सिटी 7400 Turbo चिपसेट देण्यात आला आहे, दो जास्त पावरफुल मानला जातो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन AnTuTu मध्ये 10 लाखांहून अधिक स्कोर प्राप्त करू शकतो. जर तुम्ही गेमिंग किंवा मल्टीटास्किंगसाठी स्मार्टफोन शोधत असाल तर Vivo T5x परफॉर्मंस चांगला आहे.
बॅटरीच्या बाबतीत दोन्ही स्मार्टफोन्स मजबूत पर्याय मानले जातात. Oppo A6s 5G मध्ये 6500mAh बॅटरीसह 44W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तर Vivo T5x मध्ये 44W चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 7200mAh बॅटरी देण्यात आली आहे. विवोचा दावा आहे की T5x मध्ये 40 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक ऑफर केला जातो. त्यामुळे, जर जास्त बॅकअपला तुम्ही प्राधान्य देत असाल, तर विवो T5x हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Oppo A6s 5G मध्ये 50MP + 2MP डुअल रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा सेटअप डेली फोटोग्राफीसाठी पुरेसा आहे. मात्र या स्मार्टफोनमधील सेल्फी कॅमेरा साधारण आहे, असं यूजर्सचं म्हणणं आहे. Vivo T5x मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो कंटेंट क्रिएशन आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी अधिक चांगला अनुभव ऑफर करतो. दोन्ही फोनमघ्ये 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Oppo A6s 5G हा अँड्रॉईड 15 आधारित ColorOS 15 वर चालतो. तर Vivo T5x हा अँड्रॉईड 16 आधारित OriginOS 6 वर चालतो. लेटेस्ट सॉफ्टवेअरमुळे, विवो फोन्सना दीर्घकाळासाठी अपडेट्स आणि नवीन फीचर्स मिळण्याची अधिक शक्यता आहे. याशिवाय Vivo T5x मध्ये स्टेरियो स्पीकर्स, IR ब्लास्टर आणि IP68/69 रेटिंग सारखे काही फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन प्रिमियम अनुभव ऑफर करतो.