Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Oppo A7 Pro Max 5G Launched: ओप्पोने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत एडेप्टिव रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2026 | 02:09 PM
ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • नवीन 5G स्मार्टफोन मिडरेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच
  • स्मार्टफोन लूनर ब्लॅक आणि सर्फिंग ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध
  • डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K (1,272×2,772 पिक्सेल) फ्लेक्सिबल अमोलेड डिस्प्ले
Oppo Smartphone Launched:  लोकप्रिय स्मार्टफोन आणि टेक कंपनी ओप्पोने निवडक ग्लोबल मार्केटमध्ये आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Oppo A7 Pro Max 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. नवीन 5G स्मार्टफोन मिडरेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे नवीन A सीरीज डिव्हाईस दोन रंगांच्या पर्यायात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. चला तर मग, नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

ओप्पो ए7 प्रो मॅक्स 5G ची किंमत

ऑस्ट्रियामध्ये टेक कंपनीने त्यांचे नवीन डिव्हाईस EUR 599 म्हणजेच सुमारे 61,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. डिव्हाईसची ही नवीन किंमत 6GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. ग्राहक हा स्मार्टफोन लूनर ब्लॅक आणि सर्फिंग ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य: Oppo) 

ओप्पो ए7 प्रो मॅक्स 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K (1,272×2,772 पिक्सेल) फ्लेक्सिबल अमोलेड डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत एडेप्टिव रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे आणि यामध्ये 330Hz चा मैक्सिमम टच सँपलिंग रेट देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 800 निट्सपर्यंत आणि 1,800 निट्सपर्यंत HBM ब्राइटनेस मिळणार आहे.

चिपसेट

फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 चिपसेट देखील मिळणार आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये ॲड्रेनो 629 जीपीयू देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी या डिव्हाईसमध्ये f/1.8 अपर्चर आणि 2-एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच, या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेंसर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये f/2.0 अपर्चर आणि 100-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

बॅटरी

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वायफाय 5, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, QZSS आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन्स मिळणार आहेत. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळणार आहे. लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 80W सुपरव्हूक वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी मिळणार आहे.

Web Title: Oppo a7 pro max 5g launched in selected global market with 10000mah battery read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
1

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत
2

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत

Best Selfie Camera Smartphones 2026: फोटोप्रेमींसाठी मोठी खुशखबर! कॅमेऱ्यात भारी ‘हे’ 4 नवे स्मार्टफोन चर्चेत
3

Best Selfie Camera Smartphones 2026: फोटोप्रेमींसाठी मोठी खुशखबर! कॅमेऱ्यात भारी ‘हे’ 4 नवे स्मार्टफोन चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.