
लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज... या दिवशी होणार दमदार एंट्री
Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज
टिप्स्टर अभिषेक यादवने दावा केला आहे की, आगामी Oppo Find X9s भारतात प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंंमत 79,999 रुपये असू शकते. ही किंमत डिव्हाईसच्या ग्लोबल वर्जनपेक्षा थोडी कमी आहे. उदाहरणार्थ, Oppo Find X9s मलेशियामध्ये MYR 3,599 म्हणजेच सुमारे 85,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. अशी अपेक्षा आहे की कंपनी फोनच्या लाँचच्या दिवशी त्याची नेमकी किंमत जाहीर करेल. (फोटो सौजन्य – Oppo)
आगामी स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Oppo Find X9s चे इंडियन वर्जन डिव्हाईसच्या ग्लोबल मॉडेलसारखेच असणार आहे. ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेल्या Oppo Find X9s मध्ये 6.59-इंच फुल-एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 1,800 निट्सची पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनला सपोर्ट करतो. यामध्ये 12GB एलपीडीडीआर5एक्स रॅम, 512GB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज आणि Immortalis G925 MC12 GPU दिले आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या डिव्हाईसमध्ये IP66 + IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो होल-पंच डिस्प्ले कटआउटमध्ये आहे. फोटोग्राफीसाठी डिव्हाईसमध्ये Hasselblad ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टिम असणार आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, हा हँडसेट अँड्रॉइड 16 वर आधारित ColorOS 16 सह येईल.
भारतात लाँच केल्या जाणाऱ्या Oppo Find X9s मध्ये 3nm ऑक्टा मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट आणि 7,025mAh बॅटरी दिली जाणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, Oppo Find X9s आणि Oppo Find X9 Ultra भारतात 21 मे रोजी लाँच केले जाणार आहेत. हे दोन्ही आगामी स्मार्टफोन्स देशात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या Oppo Find X9 आणि Find X9 Pro सीरीजमध्ये सहभागी होणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि ओप्पो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.