Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज
यापूर्वी, गूगलवर नवीन अकाऊंट तयार करणं म्हणजे 15GB क्लाउड स्टोरेज फ्री मिळवणं. हे स्टोरेज तुम्ही जीमेल, फोटोज किंवा ड्राईव्ह कुठेही वापरू शकत होतात. मात्र आता असं होणार नाही. गूगलवर तयार केल्या जाणाऱ्या नव्या अकाऊंटमध्ये आता 15GB स्टोरेज ऑफर केलं जाणार नाही. तर आता यूजर्सना केवळ 5GB स्टोरेज ऑफर केलं जाणार आहे. कंपनीने हा बदल का केला आहे आणि या बदलानंतर आता यूजर्सवर कसा परिणाम होणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला नव्या गूगल अकाऊंटमध्ये 15GB स्टोरेज पाहिजे असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर शेअर करावा लागणार आहे. आता साइन-अप करताना यूजर्सना एक नवीन पॉप-अप दिसणार आहे. यामध्ये लिहीले आहे की, तुमच्या अकाऊंटमध्ये 5GB स्टोरेज आहे. तुम्ही तुमचा फोन नंबर शेअर करून कोणत्याही खर्चाशिवाय 15GB स्टोरेज मिळवू शकता. रिपोर्ट्सनुसार, गूगलने मार्च महिन्यात त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल केला होता. विशेष म्हणजे गूगलने या बदलाबाबत माहिती दिली नव्हती. कंपनीने त्यांच्या ब्लॉग किंवा सोशल मीडिया हँडल्सवर याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. जेव्हा यूजर्स नवीन अकाऊंट तयार करत आहेत, त्यावेळी त्यांना या बदलाबाबत माहिती मिळत आहे.
रिपोर्ट्सनुसार, गूगलला यूजर्सना केवळ एकदाच 15GB स्टोरेज ऑफर करायचे आहे. यूजर्सनी प्रत्येकवेळी नवीन अकाऊंट तयार करून मोफत स्टोरेज मिळवे, असं कंपनीला वाटत नाही. यासाठी आता अकाऊंट मोबाईल नंबरसोबत लिंक केलं जाणार आहे. अशा प्रकारे, लोकांना प्रत्येक वेळी नवीन अकाऊंट तयार करून क्लाउड स्टोरेज वापरता येणार नाही, अशी गूगलला आशा आहे.
जर तुमच्या जिमेल अकाऊंटचं स्टोरेज फुल्ल झालं असेल तर खाली सांगितलेल्या काही सोप्या ट्रिक्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. यामुळे तुम्हाला स्टोरेजसाठी जास्तीचे पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत.






