'सुपर ब्राइट' डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीसह Oppo K13 5G अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
टेक कंपनी Oppo ने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Oppo K13 5G या नावाने लाँच करण्यात आला असून यामध्ये ‘सुपर ब्राइट’ डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय स्मार्टफोनची डिझाईन देखील अगदी कमाल आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजारांहून कमी आहे. तसेच पहिल्या विक्रीवेळी स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काऊंट देखील ऑफर केलं जाणार आहे.
भारतात Oppo K13 5G स्मार्टफोन 8GB RAM +128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB RAM +128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनी या नवीनतम फोनवर लाँच ऑफरसह बँक डिस्काउंट देत आहे. तुम्ही निवडक बँक कार्ड वापरून 1000 रुपयांच्या सवलतीसह फोन खरेदी करू शकता, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. याशिवाय, डिव्हाइसवर 6 महिन्यांपर्यंतचा विशेष नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे OPPO K13 5G खरेदी करणे आणखी सोपे होते. या फोनची पहिली विक्री 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता OPPO ई-स्टोअर आणि फ्लिपकार्टवर सुरू होईल. हे डिव्हाईस आइसी पर्पल आणि प्रिझम ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo K13 5G मध्ये प्रीमियम डिझाइन दिसत आहे, ज्यामध्ये मागील पॅनलवर एक खास स्क्वॉलर कॅमेरा आयलंड देण्यात आला आहे, ज्यामध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले आहे. कंपनीने फोनच्या डिस्प्लेचे वर्णन ‘सुपर-स्मूथ आणि सुपर ब्राइट’ असे केले आहे. एवढेच नाही तर फोनच्या सुरक्षिततेसाठी फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे.
Snapdragon 6 Gen 4 + VC Cooling + 7000mAh battery = all at ₹16,999/-#OPPOK13 is the upgrade you’ve been waiting for. Sale starts 25th April.#OPphone #LiveUnstoppable
Know more: https://t.co/O13McKde5V pic.twitter.com/9l71gyJcFk
— OPPO India (@OPPOIndia) April 21, 2025
Oppo K13 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे. जो 4nm वर बनवला आहे आणि ColorOS 15 वर चालतो. हे डिव्हाइस जास्त गरम न होता कठीण कामे हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
Oppo K13 5G मध्ये 7,000mAh बॅटरी असल्याचेही दिसून येते, जी 80W सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एवढेच नाही तर हे डिव्हाइस फक्त 30 मिनिटांत 62 टक्क्यांपर्यंत चार्ज केले जाऊ शकते.
कॅमेरा वैशिष्ट्यांच्या बाबतीतही हे डिव्हाइस एक उत्तम पर्याय आहे. कारण या डिव्हाइसच्या मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. यामध्ये AI -वर्धित वैशिष्ट्ये देखील आहेत जी तुमचा फोटोग्राफी अनुभव पुढील स्तरावर घेऊन जातात. फोनमध्ये AI इरेजर, AI रिफ्लेक्शन रिमूव्हर, AI ब्लर सारखे फीचर्स आहेत.