डिल मिस करू नका! OnePlus च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतयं तब्बल 9 हजार रुपयांचं Discount, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा
तुम्हाला नवीन प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? पण तुमचं बजेट कमी आहे? अहो, टेंशन घेऊ नका. ही बातमी वाचा. आता तुम्हाला कमी किंमतीत प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने एक उत्तम ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये कंपनी त्यांच्या ग्राहकांना OnePlus 13 स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे. त्यामुळे जरी तुमचं बजेट कमी असलं तरी देखील तुम्ही OnePlus 13 स्मार्टफोन खरेदी करू शकता. ही आकर्षक डिल फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
OnePlus 13 तुम्ही फ्लिपकार्टवर तब्बल 9 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करू शकता. त्यामुळे जर तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या प्रियजनांसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. विशेषतः जे नवीन डिव्हाइस खरेदी करण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही डिल अगदी उत्तम आहे. ही मर्यादित काळाची डील असू शकते, म्हणून तुम्ही शक्य तितक्या लवकर या डीलचा फायदा घ्यावा. या स्मार्टफोनवर सुरु असणाऱ्या डिल आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने देशात OnePlus 13 लाँच केले होते, ज्याची सुरुवातीची किंमत 69,999 रुपये आहे. वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरही, या फोनची किंमत सध्या 69,999 रुपये आहे परंतु फ्लॅपगशिप डिव्हाइस फ्लिपकार्टवर 64,299 रुपयांना सूचीबद्ध आहे. म्हणजेच, फोनवर 5,700 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे.
इतकेच नाही तर, कंपनी एक खास बँक ऑफर देखील देत आहे जिथे तुम्हाला HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर (12 महिने) 4,000रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते ज्यामुळे किंमत आणखी कमी होते. या दोन ऑफर्ससह, तुम्ही डिव्हाइसवर 9,700 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून अधिक सूट मिळवू शकता. जिथे तुम्हाला तुमच्या जुन्या फोनच्या आधारावर चांगले एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते.
OnePlus 13 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला HDR10+ सपोर्टसह 6.82-इंचाचा LTPO 3K डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्सची पीक ब्राइटनेस आहे, जी सूर्यप्रकाशातही खूप तेजस्वी डिस्प्ले असणार आहे. हा शक्तिशाली फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटने सुसज्ज आहे आणि 24GB LPDDR5X रॅम आणि 1TB UFS 4.0 स्टोरेजसह ऑफर केला आहे. याशिवाय, डिव्हाइसमध्ये 100W फास्ट चार्जिंगसह मोठी 6,000 mAh बॅटरी देखील आहे.
जर तुम्हाला फोनसोबत फोटोग्राफी करायला आवडत असेल, तर OnePlus 13 मध्ये 50MP चा प्रायमरी शूटर, 3x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. या शक्तिशाली फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.