Hackers नेही घेतला उन्हाळ्याचा फायदा! Free AC च्या नावाखाली तुम्हालाही आलाय मेसेज? Link वर क्लिक करताच रिकामं होईल अकाऊंट
स्कॅमर्स लोकांना फसवण्याची एक संधी सोडत नाहीत. स्कॅमर्स लोकांनी फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने पैसे उकळले जाऊ शकतात, यासाठी नवीन मार्ग शोधत असतात. यासाठी कधी फ्रॉड कॉल केले जातात तर कधी खोटे मेसेज केले जातात. स्कॅमर्सनी केलेल्या मेसेजमध्ये कधी आकर्षक ऑफर असतात तर कधी फ्री गिफ्टची लालच दिली जाते. याच सर्व गोष्टींमुळे लोकं स्कॅमर्सच्या मेसेज आणि कॉल्सना बळी पडतात.
आता देखील सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये लोकांना फ्री एसीची लालच देऊन लिंक क्लिक करण्यास सांगितंल आहे. हे एसी सरकारकडून दिले जात आहेत, असा दावा देखील या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. हा मेसेज एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार ‘पीएम मोदी एसी योजना 2025’ अंतर्गत 1.5 कोटी 5-स्टार एअर कंडिशनर मोफत वाटत आहे. ही योजना मे 2025 पासून लागू केली जाईल असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मेसेजमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ऊर्जा मंत्रालयाने आधीच 1.5 कोटी एसी तयार केले आहेत. लोकांना एका विशिष्ट खात्याचे अनुसरण करण्यास आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यास सांगितले होते.
A post being widely shared on social media claims that under a new scheme ‘PM Modi AC Yojana 2025’, the Government will provide free 5-star air conditioners and 1.5 crore ACs have already been prepared. #PIBFactCheck
❌This claim is #FAKE
❌No such scheme providing free 5-… pic.twitter.com/6MMJZdI2tV
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 18, 2025
या व्हायरल होत असलेल्या मेसेजचा आता सरकारच्या फॅक्ट चेक टीमने पर्दापाश केला आहे. तथापि, सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की ‘पीएम मोदी एसी योजना 2025’ अंतर्गत सरकार 5-स्टार एसी मोफत देत आहे. हा दावा खोटा आहे.” असेही सांगण्यात आले की ऊर्जा मंत्रालयाने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणीही अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये.
लोकांना गोंधळात टाकण्यासाठी आणि त्यांचा वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी असे खोटे संदेश अनेकदा पसरवले जातात. बऱ्याचदा त्यांचा उद्देश अज्ञात वेबसाइटवर ट्रॅफिक आणणे किंवा बनावट खात्यांना प्रोत्साहन देणे असतो. अशा मेसेजना लोकं बळी पडतात आणि त्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.