Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती
ओप्पोने सध्या K14x, स्टँडर्ड K14, A6c 4G, A6, आणि A6 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. Oppo K14x स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत यापूर्वी 16,999 रुपये होती. मात्र आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 17,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच 4GB + 128GB रॅम आणि स्टोरेज असलेले डिव्हाईसचे दुसरे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 19,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर यापूर्वी या व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये होती. तसेच, Oppo K14x स्मार्टफोनचे 6GB + 128GB रॅम आणि स्टोरेज असलेले टॉप व्हेरिअंट यापूर्वी 20,999 रुपयांत उपलब्ध होते. मात्र आता या स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये झाली आहे. (फोटो सौजन्य: Oppo)
Oppo K14 स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 23,999 रुपये झाली आहे. तर 6GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 25,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये झाली आहे. तसेच, Oppo K14x स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच, 6GB + 128GB व्हेरिअंट किंमत 20,000 रुपयांच्या किंमतीत खरेदी केली जाऊ शकते.
Oppo A6 सीरीजबद्दल बोलायचं झालं तर, A6 स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 26,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये, आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये झाली आहे. Oppo A6 Pro च्या नव्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये झाली आहे. Oppo A6c 4G स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये झाली आहे.
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, यापैकी काही ओप्पो स्मार्टफोन्स ॲमेझॉनवर अजूनही त्यांच्या जुन्या किमतींत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ओप्पोने यापैकी काही फोनच्या किमती यापूर्वी एप्रिल आणि जुलैमध्येही वाढवल्या होत्या.

