एआय अँकरचा जमाना गेला, आता या देशाने तयार केला चक्क AI Reporter! मानवी न्यूज रिपोटर्सपेक्षा किती वेगळा?
तुम्ही कधी AI अँकरबाबत ऐकले आहे का? असे अनेक टिव्ही चॅनेल्स आहेत जिथे AI अँकर कॅमेऱ्यासमोर बसून स्क्रिप्ट वाचतात. अनेक देशांमध्ये लोकांची या AI अँकर्सना पसंती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बातम्या सांगण्यासाठी AI अँकरची मदत घेतली जात आहे. AI अँकरनंतर आता पाकिस्तानने एक पाऊल पुढे जात AI रिपोटर्स तयार केले आहेत. ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठी प्रगती आहे. याशिवाय पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे न्यूज इंडस्ट्री एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.
पाकिस्तानच्या न्यूज चॅनल 92 न्यूजने अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून AI रिपोर्टरबाबत खुलासा केला आहे. या न्यूज चॅनेलने तयार केलेल्या या AI रिपोर्टरची खास गोष्ट म्हणजेच हा उर्दू भाषेत बातम्या वाचू शकतो. यासोबतच तो रिअल टाईम अपडेट देखील शेअर करू शकतो. म्हणजेच एखादी मोठी घटना घडली आणि त्यावर तात्काळ प्रतिक्रिया पाहिजे असल्यास हा AI रिपोर्टर समोर येऊन संबंधित घटनेबाबत माहिती देऊ शकतो. (फोटो सौजन्य – AI Created)
रिपोर्टर म्हटलं तर सर्वत्र फिरणं आलचं. मग AI रिपोर्टर फिल्ड रिपोर्टिंग करणार का, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आल आहे. हा AI रिपोर्टर घटनास्थळी जाऊन ग्राऊंड रिपोर्ट करणार का? तर याचं उत्तर आहे, नाही. AI रिपोर्टर एक वर्च्युअल अवतार आहे. म्हणजेच हा कंप्यूटर ग्राफिक्सच्या मदतीने तयार करण्यात आलेला एक चेहरा आहे, जो कॅमऱ्यावर पाहायला मिळणार आहे. तांत्रिक प्रयत्न असे असतील की लोकं जेव्हा या AI रिपोर्टरला टिव्हीवर पाहतील तेव्हा तो घटनास्थळी उपस्थित असल्याचे वाटेल, परंतु प्रत्यक्षात तो स्टुडिओच्या नियंत्रणाखाली चालवले जाईल.
AI रिपोर्टर आणि AI अँकरमुळे सोशल मीडियावर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक याला तांत्रिक प्रगती मानत आहेत, तर काहींना भीती आहे की AI रिपोर्टर आणि AI अँकरमुळे येत्या काळात पत्रकारांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. प्रश्न असा आहे की हे AI रिपोर्टर मानवांची जागा घेतील की पत्रकारांना मदत करण्यासाठी ते एक नवीन साधन बनतील? येणारा काळच या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे.
भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये AI अँकर आधीच काम करत आहेत. परंतु तिथे ते फक्त आधीच लिहीण्यात आलेली स्क्रिप्ट वाचतात. पाकिस्तानचा हा AI रिपोर्टर या बाबतीत पुढे आहे कारण तो ब्रेकिंग न्यूज दरम्यान लाईव्ह अपडेट्स देण्यास सक्षम असल्याचे म्हटले जाते.