
Poco C85 5G: काऊंटडाऊन झाला सुरू! या दिवशी भारतात होणार तगड्या स्मार्टफोनची एंट्री, बॅटरी आणि कॅमेरा एकदम टॉप
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये Xiaomi सब-ब्रँडने खुलासा केला आहे की, अपकमिंग Poco C85 5G मध्ये 6.9 इंच डिस्प्ले दिला जाणार आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 810 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि HD+ रेजोल्यूशन असणार आहे. याशिवाय फ्लिपकार्टवर Poco C85 5G माइक्रोसाइट अपडेट केले जात आहे. स्मार्टफोनमध्ये स्क्रीन अनेक TUV सर्टिफिकेशनसह उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये लो ब्लू लाइट, फ्लिकर-फ्री आणि सर्कडियन यांचा समावेश असणार आहे. यामध्ये अधिक चांगल्या आउटडोर लिसनिंगसाठी 200 टक्के सुपर वॉल्यूम मोड देखील देण्यात आला आहे.
आधीच सांगण्यात आलं आहे की, Poco C85 5G हा स्मार्टफोन भारतात 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता IST वर लाँच होणार आहे. चीनी टेक फर्मने आधीच कन्फर्म केलं आहे की, Poco C85 5G हा स्मार्टफोन भारतात मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पावर ब्लॅक कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. जारी करण्यात आलेल्या टिझरनुसार, या आगामी स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले असेल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा असणार आहे.
Poco C85 5G या आगामी डिव्हाईसमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाणार आहे. याबाबत असा दावा केला जात आहे की, ही बॅटरी 29 तासांहून अधिक सोशल मीडिया ब्राउझिंग, 16 तासांहून अधिक इंस्टाग्राम रील्स स्क्रोलिंग, 106 तासांहून अधिक संगीत प्लेबॅक आणि 23 तासांहून अधिक व्हॉट्सअॅप मेसेजिंग प्रदान करणार आहे. हा स्मार्टफोन 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 10W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करणार आहे, ज्यामुळे फोन सुमारे 28 मिनिटांमध्ये 1 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होणार आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी AI कॅमेरा असणार आहे.
रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, Poco C85 5G मध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर असणार आहे, ज्यामध्ये दोन Arm Cortex A76 कोर आणि सहा Arm Cortex A55 कोर असू शकतात. जे 2.20GHz ची पीक क्लॉक स्पीड देतात. स्मार्टफोन Android 16 वर चालण्याची शक्यता आहे.
Ans: कमी किंमतीत हाय-परफॉर्मन्स प्रोसेसर, गेमिंगसाठी उत्तम चिपसेट, मोठी बॅटरी आणि आकर्षक डिझाइन ही Poco ची USP आहे.
Ans: होय, Poco चे X-सिरीज आणि F-सिरीज मॉडेल्स विशेषतः गेमिंग परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात.
Ans: Poco फोनमध्ये मुख्यतः MIUI for Poco किंवा HyperOS वापरले जाते.