तगड्या फीचर्ससह लाँच झाले Poco F7 सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन्स, डिझाईन अशी की पाहता क्षणी तुम्हीही प्रेमात पडाल
Poco ने त्यांच्या Poco F7 सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स Poco F7 Ulltra आणि Poco F7 Pro या नावाने लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. ज्यांची किंमत 35 हजारांहून अधिक आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स मॉडेल जागतिक बाजारात लाँच केले आहेत. स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी कमाल आहे. शिवाय स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील तगडे आहेत. या सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन 50 मेगापिक्सेल लाईट फ्यूजन 800 प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह लाँच करण्यात आले आहेत. स्मार्टफोनचे व्हेरिअंट, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
Poco F7 Ultra स्मार्टफोन 599 डॉलर्स म्हणजेच सुमारे 51,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत 12GB+ 256GB व्हेरिअंटसाठी आहे. या स्मार्टफोनचा दुसरा व्हेरिअंट 16GB + 512GB हा 649 डॉलर म्हणजेच सुमारे 55,000 रुपये रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि पिवळ्या रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. Poco F7 Pro स्मार्टफोनच्या 12GB RAM + 256GB व्हेरिअंटची किंमत 449 डॉलर म्हणजेच सुमारे 38,000 रुपये आहे. तर दुसऱ्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 499 डॉलर म्हणजेच सुमारे 42,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन काळ्या, निळ्या आणि सिल्वर रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Poco F7 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा WQHD+ (1,440×3,200 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 3,200 निट्स आहे. हा डिस्प्ले HDR10+ आणि Dolby Vision ला सपोर्ट करतो. Poco F7 Pro स्मार्टफोनचा डिस्प्ले, कनेक्टिव्हिटी आणि सॉफ्टवेअर स्पेक्स अल्ट्रा व्हेरिअंटसारखेच आहेत.
हा पोको फोन अँड्रॉइड 15 वर आधारित Xiaomi च्या कस्टम यूजर इंटरफेस HyperOS 2 वर चालतो. यासोबतच, हा फोन 16 जीबी पर्यंत रॅमसह Snapdragon 8 Elite चिपसेटवर चालतो. ग्राफिक्स सपोर्टसाठी, फोनमध्ये VisionBoost D7 चिप देण्यात आली आहे. प्रो मॉडेलमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट आणि 12 जीबी पर्यंत रॅम आहे.
Poco F7 Ultra मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50 MP Light Fusion 800 इमेज सेन्सर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये OIS सह 50 MP टेलीफोटो कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. Poco F7 Pro स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. याचा प्रायमरी कॅमेरा अल्ट्रा कॅमेरा सारखाच आहे जो 50 मेगापिक्सेलचा आहे, तसेच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी, Poco F7 Ultra मध्ये Navic, NFC, Wi-Fi 7, Bluetooth 6.0, GPS/AGPS, Galileo, GLONASS, Beidou आणि USB Type-C पोर्ट आहेत. प्रो मॉडेलमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर, IP68 रेटिंग आणि AI फेस-अनलॉक फीचर आणि स्टीरिओ स्पीकर्स आहेत.
Poco F7 Ultra मध्ये 5,300mAh बॅटरी आणि 120W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. Poco F7 Pro स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.