iPhone 17 Series: Apple च्या आगामी सिरीजचे व्हिडीओ व्हायरल! लोकं म्हणतायत, अरे ही तर Google Pixel ची कॉपी
टेक जायंट कंपनी Apple ची नवीन स्मार्टफोन सिरीज iPhone 17 सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये त्यांचा स्वस्त आयफोन लाँच केला होता. हा स्वस्त आयफोन त्याच्या किंमतीमुळे प्रचंड ट्रोल झाला होता. या स्वस्त आयफोननंतर आता कंपनीला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल केल जात आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच ट्रोलिंग सुरु झालं आहे.
Apple सप्टेंबरमध्ये त्यांची आगामी स्मार्टफोन सिरीज iPhone 17 लाँच करणार आहे. या iPhone 17 सिरीजमधील काही मॉडेल्सचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळेच कंपनीला ट्रोल केलं जात आहे. iPhone 17 सिरीजच्या कॅमेरा डिझाईनची तुलना गुगल पिक्सेलसोबत केली जात आहे. 13 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीने Pixel 9 Pro XL हा स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत लाखोंच्या घरात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Pixel 9 Pro XL चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स अगदी कमाल आहेत. स्मार्टफोनची डिझाईन देखील इतर गुगल पिक्सेल मॉडेवल्सप्रमाणेच आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 एमपी ओआयएस, 48 एमपी ऑप्टिकल झूम आणि 48 एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. तिन्ही कॅमेऱ्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. गुगलचा हा स्मार्टफोन लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरला होता. गुगलच्या या स्मार्टफोन लाँचिंगनंतर काही महिन्यांतच Apple ने त्यांच्या आगामी स्मार्टफोन सिरीज आयफोन 17 ची घोषणा केली.
आयफोन 17 सिरीजचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या स्मार्टफोनचे डिझाईन Pixel 9 Pro XL प्रमाणे दिसत आहे. याच कारणामुळे सोशल मीडिया युजर्सनी Apple ला प्रचंड ट्रोल केलं आहे. appledsign नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आगामी आयफोनच्या डिझाईनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट केलं आहे.
अनेक युजर्सनी म्हटलं आहे की, आगामी आयफोनचं डिझाईन गुगल पिक्सेल सारखेच आहे. तर एका युजरने म्हटलं आहे की, आगामी स्मार्टफोन्सचं हे डिझाईन अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये आधीच लाँच करण्यात आलं आहे. दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, आगामी आयफोन अँड्रॉईड स्मार्टफोनप्रमाणे का दिसत आहे? आणखी एका युजरने म्हटलं आहे की, आगामी आयफोन 17 सिरीज Google Pixel आणि Oneplus पासून प्रेरित आहे. त्यामुळे आगामी आयफोन सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.