Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

Poco M8x 5G Launched: पोकोने भारतात एका नव्या स्मार्टफोनसह मोठा धमाका केला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 7900mAh बॅटरीसह लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2026 | 10:04 AM
चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Poco M8x 5G ची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये असून 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये 6.9-इंच 120Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 चिपसेट आणि 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • 7900mAh बॅटरीसोबत 45W फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Poco Smartphone Launched: टेक कंपनी पोकोने भारतात 7900mAh बॅटरीसह एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Poco M8x 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस M8 सीरीजचा तिसरा स्मार्टफोन आहे, जो कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने या सिरीजमध्ये Poco M8 5G आणि Poco M8 Power स्मार्टफोन लाँच केले आहेत.

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत

Poco M8x 5G ची किंमत

पोको स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आहे. कंपनी या फोनवर 2 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंटसह 27 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्ल्यू आणि लेदर ग्रीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Flipkart)

Poco M8x 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच HD+ (720 x 1600 पिक्सेल) एलसीडी टचस्क्रीन देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा स्मार्टफोन कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच हे डिव्हाईस डिस्प्ले वेट टच 2.0 सपोर्टसह येतो. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे.

प्रोसेसर

Poco M8x 5G स्मार्टफोन 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. पोको फोन अँड्रॉईड 16 सह शाओमीच्या कस्टम यूजर इंटरफेस हायपरओएस 3 वर चालतो. या स्मार्टफोनला 4 वर्षांपर्यंत ओएस अपडेट आणि 6 वर्षांपर्यंत सुरक्षा पॅच अपडेट दिले जाणार आहे.

कॅमेरा

नव्या पोको स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे, जो 2x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेकेंडरी कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा लेंस दिला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

बॅटरी

Poco M8x 5G स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,900mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच, फोनमध्ये 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जमध्ये 35 तासांची सोशल मीडिया स्क्रॉलिंग, 27 दिवसांसाठी मेसेजिंग आणि 13 तास जीपीएस नेविगशनचा सपोर्ट दिला आहे. Poco M8x 5G मध्ये ट्रिपल कूलिंग सॉल्यूशन, ज्यामध्ये 12,439 चौ.मिमी ग्रेफाइट कूलिंग एरिया, 1,924 चौ.मिमी कॉपर फॉइल लेयर आणि 3.5W थर्मल जेल देण्यात आला आहे.

Web Title: Poco m8x 5g launched in india with 7900mah battery it will be perfect for budget friendly users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
1

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!
2

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
3

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Xiaomi चा धुमाकूळ! 7900mAh बॅटरीसह नवा Redmi M100 लाँच, किंमत फक्त 22 हजारांपासून
4

Xiaomi चा धुमाकूळ! 7900mAh बॅटरीसह नवा Redmi M100 लाँच, किंमत फक्त 22 हजारांपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.