6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा... Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती
कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपयांपासून सुरु होते. कंपनी फोनवर काही खास बँक ऑफर्स देखील देणार आहे. यामुळे ग्राहकांना निवडक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि यूपीआय ट्रांजेक्शनवर 3,000 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक देखील मिळणार आहे. नवीन Pova स्मार्टफोन भारतात 21 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन आर्क व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक आणि टुंड्रा ग्रीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: flipkart)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.78-इंच हायपरलक्स ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिव्हाईस HiOS 16 वर चालते, जे अँड्रॉईड 16 वर आधारित आहे. टेक कंपनीने Pova 8 Pro 5G साठी दोन ओएस अपग्रेड्स आणि तीन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे.
कंपनीच्या या नव्या हँडसेटमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP69K रेटिंग दिली आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट चिपसेटने सुसज्ज आहे. यासोबतच या फोनमध्ये टेक्नो P1 ग्राफिक्स चिप देखील देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये एआरएम माली-जी615 एमसी2 जीपीयू देखील आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी फोनमध्ये वेपर चेंबर कूलिंग सॉल्यूशन मिळणार आहे, जे 5,000 चौरस मिमी उष्णता बाहेर टाकण्याचे क्षेत्र प्रदान करते. फोनच्या मागील बाजूला अलाइव मॅट्रिक्स डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, ज्यामध्ये 177 मिनी LED आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे 49 पेक्षा जास्त परिस्थितींसाठी ब्रीदिंग लाईट इफेक्ट्स तयार करते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजॅशनसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
कंपनीच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, बेईडू आणि गॅलिलिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे.



