Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेसेजिंगचा अनुभव बदलणार! आता थेट चॅटमधून करा व्हिडिओ कॉल, RCS मध्ये लवकरच येणार भन्नाट नवे फीचर्स

जीएसएमएने आरसीएस यूनिवर्सल प्रोफाइल 4.0 सादर करत मेसेजिंगमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. यूजर्सना लवकरच थेट चॅटमधून नेटिव्ह व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2026 | 06:10 AM
मेसेजिंगचा अनुभव बदलणार! आता थेट चॅटमधून करा व्हिडिओ कॉल, RCS मध्ये लवकरच येणार भन्नाट नवे फीचर्स

मेसेजिंगचा अनुभव बदलणार! आता थेट चॅटमधून करा व्हिडिओ कॉल, RCS मध्ये लवकरच येणार भन्नाट नवे फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • गूगल-अ‍ॅपल यूजर्ससाठी मोठी अपडेट! RCS मध्ये येणार भन्नाट नवे फीचर्स
  • चॅटमधूनच व्हिडीओ कॉल सुरू करा! RCS मध्ये नवे फीचर्स सादर
  • आरसीएस मेसेजिंगला नवी ताकद; व्हिडीओ कॉल पासून Rich Text पर्यंत मोठे बदल
ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाइल कम्युनिकेशन्स एसोसिएशन (GSMA) ने सप्टेंबर 2008 मध्ये रिच कम्युनिकेशन सर्विसेज (RCS) ला पीयर-टू-पीयर कम्युनिकेशनची सुरक्षित पद्धत म्हणून सादर केले होते. ही सर्विस स्टँडर्ड एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2EE) ऑफर करते. ज्याचा अर्थ असा आहे की, इंटरसेप्टेड टेक्स्ट मेसेज कोणतीही थर्ड पार्टी एक्सेस करू शकत नाही. आता रिच कम्युनिकेशन सर्विसेज मॅनेज करणारे एसोसिएशन जीएसएमएने घोषणा केली आहे की, नवीन आरसीएस यूनिवर्सल प्रोफाईल 4.0 सह, या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये नेटिव्ह व्हिडीओ कॉल सपोर्ट देखील दिला जाणार आहे. यासोबतच एक्सप्रेसिव स्टाइलिंगसह रिच टेक्स्ट आणि व्हिडीओ एम्बेड करण्यासह रिच कार्ड देखील मिळणार आहे. तथापी, गुगल आणि अ‍ॅपलने अद्याप या नवीन स्टँडर्डच्या एकत्रीकरणाची घोषणा केली नाही.

बजेट सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या Redmi स्मार्टफोनची भारतात दमदार एंट्री; डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

नेटिव व्हिडीओ कॉल, रिच टेक्स्ट आणि रिच कार्ड केले सादर

जीएसएमएचे टेक्निकल डायरेक्टर टॉम वॅन पेल्ट यांनी आरसीएस यूनिवर्सल प्रोफाइल 4.0 सादर केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, नवीन आरसीएस स्टँडर्ड मेसेजिंग अ‍ॅपमध्ये नेटिव्ह व्हिडीओ कॉल सपोर्ट मिळणार आहे. जी नवीन मेसेजिंग-इनिशिएटेड व्हिडिओ कॉल्स (MIVC) च्या एकत्रीकरणामुळे शक्य झाली आहे. आता एमआयव्हीसी यूजर्सना थेट टेक्स्ट मेसेजिंग विंडोमधून व्हिडीओ कॉल सुरु करण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये वन-टू-वन टेक्स्ट आणि ग्रुप चॅट दोन्हीचा समावेश असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

जीएसएमएने सांगितलं आहे की, एमआयव्हीसी ग्रुपमधील इतर सदस्य चालू असलेल्या व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यासाठी देखील सक्षम असणार आहे. ही संपूर्ण प्रोसेस व्हॉट्सएपप्रमाणेच काम करणार आहे. कॉल सुरू झाल्यावर सामील होऊ न शकलेले यूजर्ससुद्धा व्हिडिओ कॉलमध्ये सामील होण्याची विनंती स्वीकारू शकणार आहेत. तसेच MIVC बाबत असा दावा करण्यात आला आहे की, तर एमआयव्हीसीमुळे विविध उपकरणांवर आणि सेल्युलर नेटवर्क्सवर काम करू शकणाऱ्या “पहिल्या मूळतः समर्थित व्हिडिओ कॉल अनुभवाचा” मार्ग मोकळा होईल.

AI ची कमाल! तुमच्या फोटोला द्या Dhurandhar स्टाईल डॅशिंग लूक… सोशल मीडियावर व्हायरल झाले हे Prompts

आरसीएस युनिव्हर्सल प्रोफाइल 4.0 रिच टेक्स्ट मेसेजिंग देखील सादर करण्याची तयारी करत आहे. जे यूजर्सना त्यांच्या मेसेजवर एक्सप्रेसिव टेक्स्ट स्टाईल जोडण्याची सुविधा देणार आहे. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स टेक्स्ट मेसेज बोल्ड आणि इटॅलिक करू शकणार आहेत किंवा चूकून पाठवलेला एखादा शब्द काढून टाकू शकणार आहेत. जीएसएमएचे आरसीएस युनिव्हर्सल प्रोफाइल 4.0 बॅकवर्ड कंपॅटिबिलिटीला देखील समर्थन देते, म्हणजेच ते वापरकर्त्यांना त्यांच्या मजकूर संदेशांची मूळ आवृत्ती तपासण्यासाठी सूचित करेल. याव्यतिरिक्त, ते उत्तम दर्जाचे ऑडिओ, व्हिडिओ आणि संदेशांची देवाणघेवाण देखील सक्षम करते. मेसेजमध्ये स्ट्रिमिंग व्हिडीओच्या लिंक जोडण्यासाठी आणि व्यावसायिक संदेश पाठवणाऱ्यांसाठी आरसीएस युनिव्हर्सल प्रोफाइल 4.0 रिच कार्ड्स घेऊन आले आहे.

Web Title: Rcs messaging set for major upgrade native video calling and rich text features coming soon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 06:10 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.