Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Realme Smartphone Launched: ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, पण बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी Realme ने लाँच केलेला Realme 15x 5G हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 03, 2025 | 11:07 AM
Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Realme ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. कंपनीने दसऱ्याच्या मुहूर्तावर भारतात Realme 15x 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत 20 हजारांहून कमी आहे. सध्या हा स्मार्टफोन कंपनीची वेबसाईट आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने हा नवीन बजेट स्मार्टफोन वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शंसमध्ये सादर केला आहे. या डिव्हाईसची जाडी 8.28mm आहे आणि हा स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेट आणि अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

Realme 15x 5G ची किंमत आणि उपलब्धता

Realme 15x 5G हा स्मार्टफोन 6GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आहे.  (फोटो सौजन्य – X)

कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर खास बँक ऑफर्स देखील देत आहे. म्हणजेच UPI किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबतच डिव्हाईसवर सहा महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय आणि 3,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. Realme 15x 5G सध्या भारतात कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर अ‍ॅक्वा ब्लू, मरीन ब्लू आणि मरून रेड रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Realme 15x 5G चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीच्या रियलमी डिव्हाईसमध्ये 6.8 इंचाचा सनलाइट डिस्प्ले देण्यात आला आहे, जो एक HD+ डिस्प्ले आहे. डिव्हाईसमध्ये 144hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आले आहे. हे डिव्हाईस Android 15 बेस्ड Realme UI 6.0 वर चालते. फोनमध्ये आई प्रोटेक्शन मोड, स्लीप मोड, स्क्रीन रिफ्रेश रेट स्विचिंग आणि स्क्रीन कलर टेम्परेचर एडजस्टमेंट सारखे फीचर्स देखील आहे.

Realme 15x launched in India 🇮🇳 at Rs 16,999. Key specs:
– 7,000mAh battery
– MediaTek Dimensity 6300
– 50MP cameras
– 144Hz display pic.twitter.com/TtkfJGw6xw
— Harshit Gangyan (@yantra_verse) October 1, 2025

फोनला पावर देण्यासाठी 6nm वर बेस्ड ऑक्टा-कोर मीडियाटेक 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये ARM माली-G57 MC2 GPU देखील देण्यात आला आहे. एवढंच नाही तर फोनमध्ये 400 परसेंट अल्ट्रा वॉल्यूम ऑडियो, AI कॉल नॉइज रिडक्शन 2.0 आणि AI आउटडोर मोड आहे. फोनमध्ये IP69 रेटिंग आहे.

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. डिव्हाईसमध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा Sony IMX852 AI कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा OmniVision OV50D40 कॅमेरा आहे. याशिवाय, डिव्हाइसमध्ये 60W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 7,000mAh बॅटरी आहे.

Web Title: Realme 15x 5g launched in india in budget range smartphone is equipped with 50mp camera tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
1

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
2

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
4

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.