Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे
रिलायंस जियोने 5 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचा 9 वा वर्धापनदिन साजरा केला. या वर्धापनदिनानंतर कंपनीने अनेक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहे. ज्यामध्ये युजर्सना अनेक फायदे ऑफर केले जातात. यातील काही रिचार्ज प्लॅनची किंमत अत्यंत कमी आहे. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत केवळ 899 रुपये आहे, हा प्लॅन त्यांच्या युजर्सना तब्बल 90 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करतो. बाकी रिचार्ज प्लॅनसोबत तुलना करता या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत खूपच कमी आहे आणि यामध्ये भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. या रिचार्ज प्लॅनसोबत अनेक प्रमुख ब्रँड्सकडून मोफत भेटवस्तू आणि प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील मिळतात. चला या प्रीपेड प्लॅनबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया.
खरं तर कंपनीने लाँच केलेल्या या जबरदस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 899 रुपये आहे. ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबतच या रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB हाय स्पीड डेटा देखील मिळतो. ज्यासोबत कंपनी 20GB एक्स्ट्रा डेटा देखील ऑफर करते. म्हणजेच जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 200GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा प्लॅन युजर्सना रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही Jio च्या 5G नेटवर्क असलेल्या क्षेत्रात राहत असाल, तर तुम्हाला या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल, याचा अर्थ तुम्हाला या प्लॅनसह डेटाची अजिबात काळजी करण्याची गरज नाही.
केवळ डेटा आणि कॉलिंग नाही, तर Jio चा हा नवीन रिचार्ज प्लॅन त्यांच्या युजर्सना इतर अनेक फायदे ऑफर करतो. कंपनीच्या 90 दिवस व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये JioTV, JioAiCloud आणि JioHotstar सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये 3 महिन्यांचे मोफत Jio Hotstar मोबाइल आणि टीव्ही सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.
याशिवाय Jio च्या या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये JioSaavn Pro वर 3 महिन्यांसाठी 1 महिन्याचे Zomato GOLD सबस्क्रिप्शन आणि 6 महिन्यांचे NetMeds First मेंबरशिप पूर्णपणे मोफत दिले जात आहे. याव्यतिरिक्त, या योजनेत EasyMyTrip वर 2220 रुपयांपर्यंत आणि हॉटेल बुकिंगवर 15% पर्यंत सूट मिळते. ऑफर एवढ्यावरच संपत नाहीत. तुम्हाला Ajio वर 200 रुपये आणि Reliance Digital वर 399 रुपयांपर्यंत सूट मिळेल.