6300mAh बॅटरीवाला Realme चा Smartphone फोन लाँच, किंमत केवळ 7,699 रुपये! जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme ने अलीकडेच त्यांचा बजेट स्मार्टफोन C73 5G लाँच केला होता, ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनच्या सक्सेसरनंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा बजेट स्मार्टफोन कंपनीने 8 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनचं नाव Realme C71 आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील त्यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
Realme ने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स अतिशय कमाल आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा HD+ 120Hz LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये Unisoc T7250 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 6GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. याशिवाय जबरदस्त ड्यूल कॅमेरा सेटअपसह या स्मार्टफोनमध्ये अनेक अनोख्या फीचर्सचा समावेश आहे. Realme ने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Realme ने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये Android 15 वर बेस्ड realme UI 6.0 देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 6.67-इंचाचा HD+ 120Hz LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.
Realme C71 launched in India 🇮🇳 ▫️6.75″ HD+ 90Hz LCD Display, 563nits HBM
▫️Unisoc T7250 / UMS9230E
▫️13MP OV13B10 Rear
▫️5MP SC520CS Front
▫️6300mAh🔋+ 15W⚡
▫️LPDDR4X + eMMC 5.1 Price 💰
7699₹ ~ 4+64GB
8699₹ ~ 6+128GB#realme #realmeC71
1/2🧵 pic.twitter.com/GUUz8NbPoM — Tech Home (@TechHome100) July 15, 2025
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. धूळ आणि स्प्लॅशपासून संरक्षण करण्यासाठी डिव्हाईसमध्ये IP54 रेटिंग देण्यात आली आहे. फोनमध्ये खास पल्स लाइट देखील देण्यात आलं आहे. जो 9 कलर आणि 5 ग्लोइंग मोड्सना सपोर्ट करतो. हे लाइट्स कॉल, मॅसेज आणि चार्जिंग स्टेटसच्या वेळी खास ईफेक्ट देतो.
एवढंच नाही तर कंपनीने सांगितलं आहे की, डिव्हाईसमध्ये आर्मरशेल प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे आणि हे मिलिट्री-ग्रेड ड्रॉप आणि कम्प्रेशन टेस्टसह येते, ज्यामध्ये 1.8-मीटर ड्रॉप आणि 33 किलोग्रामचा प्रेशर टेस्ट देण्यात आला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 6300mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हे डिव्हाईस 6W रिवर्स वायर्ड चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, realme C71 च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत फक्त 7,699 रुपये आहे. तर 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,699 रुपये आहे, जी तुम्ही 700 रुपयांच्या बँक डिस्काउंट ऑफरनंतर फक्त 7,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन Flipkart, realme.com आणि सर्व प्रमुख स्टोअर्सवरून खरेदी करू शकता.