लॉचिंगपूर्वीच Leak झाली Realme च्या आगामी स्मार्टफोनची डिटेल्स, 7000mAh बॅटरी आणि पवारफुल प्रोसेसरसह मिळणार हे Features
Realme GT 7 आणि Realme GT 7T स्मार्टफोन भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आज 27 मे रोजी लाँच होणार आहे. रियलमीच्या या अपकमिंग GT-सीरीज स्मार्टफोनफोनचे डिटेल्स लिक झाले आहेत. Realme GT 7 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच आणि Realme GT 7T स्मार्टफोनमध्ये 6.68-इंच डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप, 7000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे किंमत देखील लिक झाली आहे.
Realme GT 7 आणि Realme GT 7T स्मार्टफोन लाँचिंगपूर्वीच Amazon Germany वेबसाइटवर स्पॉट झाला आहे. आगामी दोन्ही स्मार्टफोन दोन – दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केले जाणार आहेत. Realme GT 7 स्मार्टफोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे बेस व्हेरिअंट 12GB रॅम + 256GB स्टोरेज 749 यूरो म्हणजेच सुमारे 72,000 रुपये आणि दुसरा व्हेरिअंट 12GB रॅम + 512GB स्टोरेज 799 यूरो म्हणजेच सुमारे 77,000 रुपयांना लाँच केला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme GT 7T स्मार्टफोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे. Realme GT 7T स्मार्टफोनचा बेस व्हेरिअंट 12GB रॅम + 256GB स्टोरेज 649 यूरो म्हणजेच सुमारे 62,000 रुपये आणि दूसरा व्हेरिअंट 12GB रॅम + 512GB स्टोरेज 699 यूरो म्हणजेच सुमारे 68,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. Realme GT 7 स्मार्टफोन IceSense Black आणि IceSense Blue shades रंगात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर Realme GT 7T स्मार्टफोन IceSense Blue आणि IceSense Yellow रंगात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Realme GT 7 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1.5K आणि पीक ब्राइटनेस 6,000nits आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9400e प्रोसेसरवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये कूलिंगसाठी 7,700mm वेपर चेंबर कूलिंग सेटअप दिला जाणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आहे, जो Sony IMX906 सेंसर आहे. हे ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो.
Realme GT 7T स्मार्टफोनमध्ये 6.68-इंचाचा डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1.5K आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. रियलमीच्या फोनमध्ये MediaTek Dimensity 8400-Max चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल असण्याची शक्यता आहे, जो Sony IMX896 चा सेंसर आहे. यासोबतच फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस दिला जाण्याची शक्यता आहे. Realme GT 7 आणि Realme GT 7T दोन्ही स्मार्टफोनमध्ये 7,000mAh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.