Samsung ने गाठलं मोठं यश! देशात टेलिव्हिजन विक्रीमध्ये १०,००० कोटी रूपयांचा टप्पा पार करणारा ठरला पहिला ब्रँड
टेक ब्रँड सॅमसंगने एक मोठी कामगिरी केली आहे. कंपनीच्या टेलिव्हिजन व्यवसायाने कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये विक्रीत १०,००० कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडपैकी एक आहे. कंपनीने आता यशाचं एक नवं शिखर गाठलं आहे. टेलिव्हिजन उद्योगामध्ये हा मोठा टप्पा संपादित करणारा सॅमसंग भारतातील पहिला ब्रँड ठरला आहे.
सॅमसंगने सांगितले की, त्यांना २०२५ मध्ये दोन-अंकी वाढ संपादित करण्याचा आत्मविश्वास आहे, जेथे प्रीमियम ऑफरिंग्जचा व्यापक पोर्टफोलिओ आणि मोठ्या स्क्रिन आकााराच्या व एआय-पॉवर्ड टेलिव्हिजन्ससाठी वाढत्या मागणीचे पाठबळ आहे. सॅमसंगच्या इतर गॅझेट्सप्रमाणे टेलिव्हिजन देखील भारतात लोकप्रिय आहेत.
“२०२४ सॅमसंग इंडियासाठी उल्लेखनीय वर्ष ठरले. मूल्यासंदर्भात, आम्ही १०,००० कोटी रूपयांचा टर्नओव्हर गाठला. आता आमची या वर्षात दोन-अंकी वाढीसह विकास करण्याची महत्त्वाकांक्षा आहे, जेथे आमच्या नवीन एआय टीव्ही लाइनअपचे पाठबळ आहे, जी प्रत्येक फ्रेममध्ये नवीन उत्साहाची भर घालते, घरामध्ये सिनेमॅटिक अनुभवासाठी नवीन बेंचमार्क स्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एआय-पॉवर्ड स्क्रिन्सच्या या नवीन युगासह आम्ही नेक्स्ट-जनरेशन टीव्ही अवलंबनाला गती देण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतातील प्रीमियम टेलिव्हिजन विभागातील आमचे नेतृत्व अधिक दृढ करू असा विश्वास आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ संचालक विप्लेश दंग म्हणाले.
सॅमसंगने नुकतेच भारतात व्हिजन एआय-पॉवर्ड टेलिव्हिजन्सची २०२५ टीव्ही लाइनअप लाँच केली. या लाइनअपमध्ये निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी ४के, ओएलईडी, क्यूएलईडी आणि द फ्रेम यामध्ये ४० हून अधिक मॉडेल्स सादर करण्यात आले. सॅमसंग व्हिजन एआय स्क्रिन्सना अधिक स्मार्टर, अधिक सर्वोत्तम आणि वैयक्तिक करण्यामधील मोठी झेप आहे. हे वैशिष्ट्य टेलिव्हिजन्सना अॅडप्टिव्ह हब्समध्ये बदलते, जे वातावरण आणि युजर्सच्या वागणूकीनुसार प्रतिसाद देतात. सॅमसंगचे हे टेलिव्हिजन दैनंदिन जीवनामध्ये उत्साहाची भर घालतात, टीव्हीला मनोरंजनापेक्षा इंटेलिजण्ट सोबती बनवतात. सॅमसंग व्हिजन एआय स्मार्टथिंग्जच्या माध्यमातून पिक्चर व साऊंडचे रिअल-टाइम ऑप्टिमायझेशन, गेस्चर-आधारित नेव्हिगेशन आणि स्मार्ट होम इंटीग्रेशन देते.
व्हिजन एआय-सक्षम लाइन-अपमध्ये एआय अपस्केलिंग प्रो, ग्लेअर-फ्री व्युइंग आणि जनरेटिव्ह आर्ट वॉलपेपर्स यांसारखे इनोव्हेशन्स देखील आहेत, ज्यामुळे सॅमसंग टेलिव्हिजन्स मनोरंजनपूर्ण डिवाईसेस असण्यासोबत भारतातील आधुनिक घरांसाठी सर्वोत्तम जीवनशैली हब्स देखील आहेत.
सॅमसंगने भारतातील टेलिव्हिजन बाजारपेठेत दीर्घकालीन नेतृत्वासाठी स्वत:ला स्थित केले आहे, जेथे ब्रँड आपल्या ४३-इंच आणि मास-मार्केट श्रेणीच्या माध्यमातून मूल्याप्रती जागरूक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करत आहे, तसेच विस्तारित प्रीमियम श्रेणीमध्ये मूल्य व आकारमान विकासाला गती देत आहे. प्रबळ ऑफलाइन फूटप्रिंट आणि शक्तिशाली उत्पादन रोडमॅपसह सॅमसंग भारतात एआय-सक्षम, सर्वोत्तम होम एंटरटेन्मेंटप्रती परिवर्तनाला गती देण्यास उत्तमरित्या सज्ज आहे.