वादळ येऊदे नाही तर त्सुनामी, तुमच्या स्मार्टफोनवर मिळणार प्रत्येक Weather Update; फक्त करावी लागेल ही सेटिंग वादळ येऊदे नाही तर त्सुनामी, तुमच्या स्मार्टफोनवर मिळणार प्रत्येक Weather Update; फक्त करावी लागेल ही सेटिंग
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे लोकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण या सर्वांबाबत अपल्याला वेळीच अलर्ट मिळणं फार गरजेचं आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या स्मार्टफोनवर हवामान अपडेट मिळवू शकता. तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशा काही सेटिंग्ज आहेत, ज्या इनेबल केल्यास तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी आधीच अलर्ट मिळेल.
लेटेस्ट आणि अपडेटेड Android आणि iPhone स्मार्टफोन्समध्ये Emergency Alerts आणि Weather Alert Notifications सारखे फीचर्स दिले जातात. या फीचर्समुळे तुम्हाला तुमच्या परिसरातील हवामान परिस्थितीतबाबत माहिती मिळते. तुम्हाला केवळ तुमच्या स्मार्टफोनमधील ही सेटिंग अॅक्टिव्ह करायची आहे. ही सेटिंग अॅक्टिव्ह करताच जेव्हा तुमच्या परिसरात वादळ, वारा, मुसळधार पाऊस, गारपीट याबाबत इशारा जारी केला जाईल तेव्हा तुमचा स्मार्टफोन तुम्हाला अलर्ट करेल. ही सेटिंग अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री, गेमर्ससाठी ठरणार वरदान! किंमत तुमच्या बजेटमध्ये
दरवर्षी, वादळ, वादळे आणि मुसळधार पावसामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये जीवित आणि वित्तहानी होते. जर लोकांना आधीच सूचना मिळाल्या तर घराबाहेर न पडणे, वाहन सुरक्षितपणे पार्क करणे, विद्युत उपकरणे बंद ठेवणे इत्यादी खबरदारी वेळेवर घेता येईल.






