Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme P4s Lite 4G Launched: बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये रिअलमीने एक नवीन डिव्हाईस लाँच केले आहे. या डिव्हाईसची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2026 | 09:52 AM
कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • भारतीय स्मार्टफोन बाजारात Realme P4s Lite 4G व्हेरिअंट लाँच
  • स्मार्टफोनचे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्स लाँच
  • रिअलमी स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.75-इंच एलसीडी डिस्प्ले
Realme Smartphone Launched: टेक कंपनी रिअलमीने काही महिन्यांपूर्वी रिअलमी पी4 एस लाईट 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचे 4G व्हेरिअंट लाँच केले आहे. रिअलमीने गुपचूप भारतीय स्मार्टफोन बाजारात Realme P4s Lite 4G हे नवीन व्हेरिअंट लाँच केले आहे. बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची विक्री देखील लवकरच सुरु होणार आहे. रिअलमी पी4 लाईट 4G स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस

रिअलमी पी4 एस लाईट 4G स्मार्टफोनची किंमत

टेक कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनचे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये 4GB+64GB आणि 4GB+128GB यांचा समावेश आहे. या डिव्हाईसच्या 4GB+64GB व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आणि 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन नेबुला ब्लॅक आणि मूनलाइट सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Realme) 

रिअलमी पी4 एस लाईट 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

भारतात लाँच करण्यात आलेल्या रिअलमी स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.75-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या एचडी प्लस डिस्प्लेचे रेजोल्यूशन 1570 x 720 पिक्सेल आहे. रिअलमीच्या या स्मार्टफोनची मॅक्सिमम ब्राईटनेस 900 निट्स आहे. डिस्प्लेचा मॅक्सिमम टच सँपलिंग रेट 240Hz आणि Viviv मोडमध्ये कलर गॅमट 86% DCI-P3 आहे. फोनमध्ये कंपनीने Panda MN228 प्रोटेक्टिव ग्लासचा वापर केला आहे.

प्रोसेसर

कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन युनिसॉक टी7250-प्रोसेसर, 4GB की एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईडवर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस रिअलमी यूआयवर चालतो.

बॅटरी

रिअलमी पी4 एस लाईट 4G स्मार्टफोनमध्ये 15W चार्जिंग आणि 15W यूएसबी पॉवर डिलिव्हरी (रिवर्स चार्जिंग) सपोर्टसह 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे वजन सुमारे 215 ग्रॅम आहे. फोनच्या बाजूला साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज

कॅमेरा

स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनचा रिअर कॅमेरा 30fps वर 1080p व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये वायफाय 5, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5G आणि एनएफसीचा सपोर्ट नाही दिला आहे.

Web Title: Realme launched new p4s lite 4g smartphone in india users will get amazing features in less price hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज
1

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स
2

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
3

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

5G स्मार्टफोनच्या दुनियेत नव्या खेळाडूची एंट्री! अखेर Vivo S60t चीनमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स अन् किंमत
4

5G स्मार्टफोनच्या दुनियेत नव्या खेळाडूची एंट्री! अखेर Vivo S60t चीनमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स अन् किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.