Redmi Note 15: एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा! तगड्या बॅटरीसह भारतात नव्या स्मार्टफोनचे आगमन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट रेडमी नोट 15 प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 1.5K रिजोल्यूशन आणि 120hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. एवढंच नाही तर कंपनीच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये डॉल्बी व्हिजन, HDR10+ चा सपोर्ट देखील दिला आहे. फोन गोरिला ग्लास व्हिक्टस 2 की प्रोटेक्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 चिपसेट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह यामध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे. रेडमी नोट 15 प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाइड लेंस दिली आहे. समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ 5.4, NFC, IR ब्लास्टर आणि IP66, IP68, IP69, आणि IP69K रेटिंग मिळाली आहे. (फोटो सौजन्य – X)
We didn’t just build a smartphone; we engineered a legend. Introducing #REDMINote15ProPlus 5G.#200MasterPixelCamera, IP69K Durability and Snapdragon® 7s Gen 4. Now that’s #SimplySuperb.
Starting at ₹34,999* | First sale on 4th Feb Pre-Book Now: https://t.co/Z6Ctvfdly9 pic.twitter.com/WDcWeNd42f — Redmi India (@RedmiIndia) January 29, 2026
सिरीजमधील प्रो मॉडेलमध्ये 6.83-इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन दिले आहे. डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400-अल्ट्रा चिपसेट दिले आहे. याशिवाय कंपनीच्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 6,580mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. Redmi Note 15 Pro मध्ये कॅमेरा सेटअप प्रो प्लस सारखाच आहे. यामध्ये OIS सह 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 20MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
रेडमी नोट 15 प्रो प्लस तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 43,999 रुपये आहे. एवढेच नाही तर, तुम्ही निवडक कार्ड वापरून 3,000 रुपयांपर्यंत बँक सूट देखील मिळवू शकता. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 4,999 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स देखील मिळतील, ज्यामध्ये एक वेळ मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा समावेश आहे. तर डिव्हाईसच्या प्रो मॉडेलची किंमत 8GB + 128GB व्हेरिअंटसाठी 29,999 रुपये आहे. तर या डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आहे. या फोनवर तुम्ही 3,000 रुपयांपर्यंत बँक सूट देखील मिळवू शकता. हे डिव्हाइस 4 फेब्रुवारी 2026 पासून mi.com, amazon.in आणि अधिकृत रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Ans: Redmi ही चीनमधील Xiaomi ग्रुपची सब-ब्रँड कंपनी आहे.
Ans: होय. Redmi चे बहुतांश स्मार्टफोन भारतातच “Make in India” अंतर्गत तयार होतात.
Ans: होय. Redmi Note आणि Redmi K सिरीजमधील फोन गेमिंगसाठी लोकप्रिय आहेत. त्यात दमदार प्रोसेसर आणि मोठी बॅटरी मिळते.






