Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या Redmi स्मार्टफोनची भारतात दमदार एंट्री; डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

रेडमी पुन्हा एक भारतात धमाका करण्यासाठी आणि इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने भारतात एक बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2026 | 01:13 PM
बजेट सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या Redmi स्मार्टफोनची भारतात दमदार एंट्री; डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

बजेट सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या Redmi स्मार्टफोनची भारतात दमदार एंट्री; डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोनची किंमत 17 हजार रुपयांहून कमी
  • लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये गुगल जेमिनी, सर्कल टू सर्च फीचर्स
  • Redmi 15A मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप
Xiaomi चा सब-ब्रँड रेडमीने भारतात एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Redmi 15A या नावाने शुक्रवारी कंपनीने भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटअंतर्गत लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 17 हजार रुपयांहून कमी आहे. नवीन A सीरीजमधील हा स्मार्टफोन कंपनीने तीन रंगात लाँच केला आहे. लेटेस्ट लाँच Redmi 15A मध्ये ऑक्टा-कोर 5G चिपसेट दिला आहे. Redmi 15A मध्ये 6,300mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये प्रिमियम फीचर्स ऑफर करतो.

Apple ने यूजर्सना दिला झटका! बंद केले ‘हे’ पावरफुल डिव्हाईस, नवा मॉडेल येणार नाही?

भारतात Redmi 15A ची किंमत आणि उपलब्धता

भारतात Redmi 15A स्मार्टफोन 4GB रॅम+ 64GB स्टोरेज, 6GB + 12GB आणि 4GB + 128GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4GB रॅम+ 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपयांपासून सुरु होते. तर 6GB + 12GB व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 14,499 रुपये आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन ब्लॅक, ऑसम ब्लू आणि अमेज पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा नवीन रेडमी स्मार्टफोन 3 एप्रिलपासून फ्लिपकार्ट, Mi.com आणि शाओमीच्या अधिकृत रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Redmi )

Redmi 15A चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डुअल-SIM वाला Redmi 15A स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित आहे. ज्यामध्ये HyperOS 3.0 आहे. रेडमी या फोनसाठी चार वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचे आश्वासन देत आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये गुगल जेमिनी, सर्कल टू सर्च आणि शाओमी इंटरकनेक्टिव्हिटी यासांरखे AI-बेस्ड फीचर्स देण्यात आले आहेत. रेडमीच्या या हँडसेटमध्ये 6.9-इंच HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz, 90Hz आणि 120Hz दरम्यान बदलत राहतो. स्क्रीन 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेटला सपोर्ट करते आणि याची पीक ब्राइटनेस 800 निट्स असल्याचे सांगितले आहे.

रॅम आणि स्टोरेज

Redmi 15A मध्ये 6nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला ऑक्टा-कोर T8300 5G SoC दिला आहे. ज्यासोबत माली-जी57 जीपीयू, 6 जीबी पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनचे रॅम वर्चुअल रॅम एक्सपांशनला सपोर्ट करते, तर इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा

फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Redmi 15A मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/2.0 अपर्चरवाला 32-मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेरा आणि एक LED फ्लॅश समाविष्ट आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP52-रेटेड बिल्ड दिले आहे.

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

Redmi 15A मध्ये 6,300mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच 15W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे. स्मार्टफोनची बॅटरी 7.5W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही बॅटरी दोन दिवसांपर्यंतचा बॅकअप देऊ शकते. या स्मार्टफोनचे वजन 210 ग्रॅम आहे.

AI ची कमाल! तुमच्या फोटोला द्या Dhurandhar स्टाईल डॅशिंग लूक… सोशल मीडियावर व्हायरल झाले हे Prompts

कनेक्टिविटी पर्याय

Redmi 15A मध्ये 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, जीपीएस/एजीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, एफएम रेडिओ, 3.5mm ऑडिओ जॅक, यूएसबी ओटीजी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसारखे अनेक कनेक्टिविटी पर्याय दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, ई-कंपास, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि फिंगरप्रिंट स्कॅनर सारखे सेंसर देखील दिले आहेत. या डिव्हाईसमध्ये स्टीरियो स्पीकर देखील दिले आहेत.

Web Title: Redmi 15a launched in india in budget segment design features and specifications are amazing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी
1

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
2

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर
3

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल
4

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.