Apple ने यूजर्सना दिला झटका! बंद केले 'हे' पावरफुल डिव्हाईस, नवा मॉडेल येणार नाही?
AI ची कमाल! तुमच्या फोटोला द्या Dhurandhar स्टाईल डॅशिंग लूक… सोशल मीडियावर व्हायरल झाले हे Prompts
मार्च 2026 मध्ये कंपनीने घोषणा केली आहे की, Mac प्रोडक्ट्स जसे M4-पावर्ड मॅकबुक एअर आणि मॅक प्रो अधिकृतपणे बंद केले जात आहे. कंपनीने भारतासह जगभरातील त्यांच्या वेबसाईटवरून मॅक प्रो प्रोडक्ट हटवले आहे. M2 अल्ट्राने सुसज्ज असलेल्या या फ्लॅगशिप डेस्कटॉपची विक्री देखील आता थांबवण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षांपासून या डिव्हाईससाठी कंपनीने अपडेट जारी केले नव्हते. कंपनी या डिव्हाईसचे नवीन मॉडेल लाँच करणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेक दिग्गज कंपनीने अॅपल इंडिया आणि यूएसची वेबसाईट अपडेट केली असून M2 प्रोसेसर वाले मॅक प्रो (2023) ऑनलाइन स्टोअरमधून हटवण्यात आले आहे. याप्रमाणे कंपनीने अधिकृतपणे या डेस्कटॉपची विक्री बंद केली आहे. हे डिव्हाईस ॲपल सिलिकॉन एम 2 अल्ट्रा प्रोसेसरवर आधारित होते. आता अॅपलच्या ऑनलाईन स्टोअरच्या ‘डेस्कटॉप्स’ विभागात फक्त नवीन iMac, Mac Mini आणि Mac Studio विक्रीसाठी उपलब्ध आहेत, जे अनुक्रमे M4, M4 Pro आणि M4 Max पर्यंतच्या चिपसेटसह सुसज्ज आहेत.
असं सांगितलं जात आहे की, कंपनीने पुष्टी केली आहे की, मॅक प्रो लाईनअप बंद केली जात आहे. तसेच अॅपल भविष्यात मॅक प्रो मॉडेल लाँच करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आता मॅक प्रो (2023) अशा डिव्हाईसच्या यादीत समाविष्ट झाला आहे, जे डिव्हाईस कंपनीने मार्च माहिन्यात बंद केले होते. या यादीमध्ये ॲपलच्या प्रो डिस्प्ले एक्सडीआरचाही समावेश होता, ज्याची जागा आता ॲपलचा फ्लॅगशिप पॅनल म्हणून नवीन स्टुडिओ डिस्प्ले एक्सडीआरने घेतली आहे.
भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर
जून 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक विकासक परिषद (WWDC) मध्ये अॅपलने मॅक प्रो (2023) लाँच केले होते. लाँचिंगनंतर सुमारे 3 वर्षांनी आता कंपनीने हे डिव्हाईस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲपल सिलिकॉन एम 2 अल्ट्रा प्रोसेसरवर असलेला हा डेस्कटॉप भारतात टावर एनक्लोजरसाठी 7,29,900 रुपयांत लाँच करण्यात आला होता आणि रॅक एनक्लोजरची किंमत 7,79,900 रुपये आहे. मॅक प्रो (2023) 24-कोर CPU आणि 76-कोरपर्यंत GPU सह लाँच करण्यात आला होता.






