
नव्या Redmi 17 5G ची सर्वत्र चर्चा! बजेट किंमतीत मिळणार तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल खुश
कंपनीने त्यांचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB असलेल्या बेस व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आहे. तर, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री 10 सप्टेंबरपासून ॲमेझॉन आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे भारतात सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन एब्सोल्यूट ब्लॅक, एंडलेस ब्लू आणि इटरनल ऑरेंज या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Redmi)
कंपनीने लांच केलेल्या नवीन रेडमी स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 825 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन मिळणार आहे. हे डिव्हाईस TÜV राइनलँड लो ब्लू लाइट, सर्कैडियन फ्रेंडली आणि फ्लिकर-फ्री सर्टिफिकेशन्ससह लाँच करण्यात आले आहे.
रेडमीच्या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 प्रोसेसर देखील मिळणार आहे, जो 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 2.4GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड दिली आहे. यामध्ये ॲड्रेनो जीपीयू, 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.
रेडमी 17 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये आणखी एक कॅमेरा देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.05 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
याशिवाय, या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 7,900mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, डुअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक आणि जीपीएसची सुविधा देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.