Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै

Realme Smartphone Price Hike: रिअलमीने त्यांच्या दोन स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. या स्मार्टफोन्सच्या नवीन किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2026 | 01:42 PM
दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Follow Us
Follow Us:
  • Realme 16 आणि Realme 16T च्या किंमतीत वाढ
  • रिअलमी 16 स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट आता 41,999 रुपयांत उपलब्ध
  • कंपनीने दोन स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना मोठा झटका
टेक कंपनी रिअलमीने पुन्हा एकदा त्यांच्या मिड-रेंज स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी कंपनीने त्यांच्या दोन स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोन्समध्ये Realme 16 आणि Realme 16T या दोन डिव्हाईसचा समावेश आहे. कंपनीने यापूर्वी देखील त्यांच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली होती. दिवाळीपूर्वीच कंपनीने दोन स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीच्या रिअलमी 16 सिरीजचा भाग आहेत, ज्याला गेल्यावर्षी सादर करण्यात आले होते.  (फोटो सौजन्य: Realme) 

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स

रिअलमी स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या

रिअलमी 16 आणि रिअलमी 16 टी या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत कंपनीने वाढ केली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या तिन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. कंपनीने केलेल्या या दरवाढीनंतर आता रिअलमी 16 ची सुरुवातीची किंमत 41,999 रुपये झाली आहे. यापूर्वी या डिव्हाईसची किंमत 36,999 रुपये होती. कंपनीने स्मार्टफोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. रिअलमी 16 टी आता 31,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. यापूर्वी या स्मार्टफोनची किंमत 30,999 रुपये होती. कंपनीने फोनची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे.

रिअलमी 16 ची नवी किंमत

रिअलमी 16 स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट आता 41,999 रुपयांत उपलब्ध आहे. यापूर्वी या स्मार्टफोनची किंमत 36,999 रुपये होती. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 43,999 रुपये झाली आहे. या व्हेरिअंटची किंमत पूर्वी 39,999 रुपये होती. 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत आता 47,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी या डिव्हाईसची किंमत 42,999 रुपये होती.

रिअलमी 16 टी ची नवी किंमत

रिअलमी 16 टी 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 31,999 रुपये झाली आहे. या डिव्हाईसची किंमत पूर्वी 30,999 रुपये होती. 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत पूर्वी 32,999 रुपये होती. आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी 33,999 रुपये मोजावे लागणार आहेत. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत आता 36,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी या डिव्हाईसची किंमत 35,999 रुपये होती.

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

रिअलमी 16 सिरीजचे फीचर्स

रिअलमी 16 सिरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. रिअलमी 16 मध्ये कंपनीने 7000mAh बॅटरी दिली आहे. रिअलमी 16 टी मध्ये 8,000mAh बॅटरी मिळणार आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. हे दोन्ही फोनच्या मागील बाजूला 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

Web Title: Realme 16 and realme 16t prices hiked in india check new prices hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
1

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे
2

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral
3

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत
4

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.