
भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
रेडमी 17सी 5G स्मार्टफोन 4GB+128GB आणि 6GB+128GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आहे. या नवीन डिव्हाईसची विक्री भारतात 7 ऑक्टोबरपासून ॲमेझॉन आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन कॉफी ब्रू, डार्क नाइट आणि पर्पल डॉन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Redmi)
रेडमीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट, एचबीएममध्ये 810 निट्सपर्यंत ब्राइटनेस देखील मिळणार आहे. लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 16.7 मिलियन कलर आणि 83 टक्के एनटीएससी कवरेज मिळणार आहे. या फोनमध्ये लो ब्लू लाईट, सर्केडियन फ्रेंडली आणि फ्लिकर-फ्री यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट देखील मिळणार आहे, जो 2.4GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. यामध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयूसह 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB यूएफएस 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज देखील मिळणार आहे. फोनमध्ये वर्चुअल रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यामुळे रॅम 6GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला जाणार आहे.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा मिळणार आहे. हा फोन 1080p/30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतो. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला f/2.0 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी मिळणार आहे. कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, डुअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि बेईडौचा सपोर्ट देखील मिळणार आहे.