Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कॅमेरा, रॅम आणि बॅटरी या तीन प्रमुख गोष्टींवर अधिक भर दिला जातो. 8GB, 12GB किंवा 16GB रॅम असलेला स्मार्टफोन अधिक चांगला मानला जातो. हे स्मार्टफोन्स हँग होत नाहीत, असं अनेकांना वाटतं. पण खरंच असं असतं का? कारण अनेकदा दमदार रॅम असलेल्या स्मार्टफोनमध्ये देखील हँग होण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी स्मार्टफोन स्लो होतात, स्मार्टफोनमधील अॅप्स व्यवस्थित काम करत नाहीत. अशावेळी यूजर्सच्या मनात येणारा प्रश्न म्हणजेच स्मार्टफोनची रॅम पावरफुल असताना देखील डिव्हाईस हँग का होते? रॅम दमदार असताना देखील स्मार्टफोनचा परफॉर्मंस खराब का होतो? चला तर मग आज याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
स्मार्टफोनची स्पीड केवळ रॅमवर अवलंबून नसते. तर स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे प्रोसेसर, स्टोरेजची स्पीड, सॉफ्टवेयर ऑप्टिमाइजेशन आणि बॅकग्राउंड सुरु असणारे अॅप्स स्मार्टफोनचा परफॉर्मंस ठरवतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये फास्ट रॅम असेल मात्र प्रोसेसर जुना असेल तर डिव्हाईसचा परफॉर्मंस खराब होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Pinterest)
जर तुमच्या स्मार्टफोनचे इंटरनल स्टोरेज फुल झाले असेल स्मार्टफोन स्लो होऊ शकते. सिस्टिमला टेम्पररी फाइल्स, अॅप डेटा आणि कॅशसाठी स्टोरेजची आवश्यकता असते. स्टोरेज फुल झाले असेल आणि स्पेस खूप कमी असेल तर अॅप उघडण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. यामुळे स्मार्टफोन स्लो होऊ शकतो.
अनेकदा असं देखील घडतं की, बॅकग्राऊंडमध्ये चालणाऱ्या अॅप्समुळे देखील फोनच्या परफॉर्मंसवर परिणाम होतो आणि फोन स्लो होतो. सोशल मीडिया, मेसेजिंग, क्लाऊड बॅकअप आणि लोकेशनसारख्या सर्विस फोनच्या रिसोर्सचा वापर करतात. यामुळे रॅम आणि प्रोसेसर दोन्हीवर जास्तीचा भार पडू शकतो.






