
नव्या Redmi 17C स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री! 120Hz डिस्प्ले आणि 5160mAh बॅटरीने सुसज्ज... किंमत 15 हजारांहून कमी
Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान
कंपनीने रेडमी 17 सी स्मार्टफोन 4GB+64GB आणि 4GB+128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB+64GB व्हेरिअंटची किंमत CNY 799 म्हणजेच सुमारे 12,000 रुपये आणि 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत CNY 899 म्हणजेच सुमारे 13,000 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन काळा, डॅनक्सिया रेड आणि सी ब्रीज ब्लू कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
डुअल-सिम सपोर्टसह लाँच करण्यात आलेला नवा रेडमी स्मार्टफोन हायपरओएस 3 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.88-इंच एचडी+ (720×1,640 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 600 निट्सची ग्लोबल ब्राइटनेस ऑफर करतो. या स्क्रीनला TÜV Rheinland ची ‘लो ब्लू लाइट’, ‘सर्केडियन फ्रेंडली’ आणि ‘फ्लिकर-फ्री’ प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर, रेडमी 17 सी मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G81 अल्ट्रा चिपसेट देण्यात आला आहे, जो एआरएम माली-जी 52 एमसी2 जीपीयू, 4GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. जुना रेडमी 17 सी स्मार्टफोन देखील मीडियाटेक हेलिओ G81 अल्ट्रा चिपसेटवर आधारित आहे.
फोटोग्राफीसाठी, नव्या रेडमी स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
नव्या स्मार्टफोनमध्ये 5,160mAh बॅटरी दिली आहे, जी 18W पर्यंत वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने रिटेल बॉक्समध्ये 10W चा चार्जर दिला आहे.
रेडमी 17 सी स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4, वायफाय डायरेक्ट, जीपीएस, बेईडौ, गॅलिलिओ, ग्लोनास, एजीएनएसएस आणि एक 3.5mm चा ऑडियो जॅक दिला आहे. यामध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपस आणि वर्चुअल प्रॉक्सिमिटी सेंसर सारखे सेंसर्स दिले आहेत. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.