
Xiaomi चा धुमाकूळ! 7900mAh बॅटरीसह नवा Redmi M100 लाँच, किंमत फक्त 22 हजारांपासून
iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत
कंपनीने चीनमध्ये त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB+128GB, 6GB+256GB आणि 8GB+256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 1,799 युआन म्हणजेच सुमारे 22 हजार रुपये, 6GB+256GB व्हेरिअंटची किंमत 1,999 युआन म्हणजेच सुमारे 25 हजार आणि टॉप 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 2,199 युआन म्हणजेच सुमारे 27 हजार रुपये आहे. Redmi M100 भारतात कधी लाँच केला जाईल, याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, स्टारी व्हाइट आणि वाइल्डरनेस ग्रीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: X)
रेडमीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. स्क्रीनमध्ये आई-प्रोटेक्शन फीचर देखील मिळणार आहे आणि याच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लासचा वापर करण्यात आला आहे.
डिव्हाईश धूळ आणि पाण्याचे थेंब यांच्यापासून सुरक्षित राहण्यायोग्य अशा प्रकारे डिझाइन केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, याचा फिंगरप्रिंट सेन्सर 5 लाख वेळा टच करण्यास सक्षम आहे. तसेच, या फोनच्या मागील पॅनेलवर ‘फोर-डायमेंशनल मायक्रो-कर्व्हड’ डिझाइन देण्यात आले आहे. फोनमध्ये कॅमेरा मॉड्यूलजवळ RGB डायनेमिक लाइटिंग देखील मिळणार आहे, जो याला एक वेगळा लुक देतो.
परफॉर्मंससाठी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे, जो 4nm प्रक्रियेवर तयार केलेला एक ऑक्टा-कोअर चिपसेट आहे. डिव्हाईसमध्ये शाओमीचा नवीन Surge OS 3 मिळणार आहे. याशिवाय या नव्या फोनमध्ये एनएफसी, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळणार आहे.
फोटोग्राफी लवर्ससाठी या नवीन फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देखील मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये फिल्म फिल्टर, पोर्ट्रेट मोड, नाइट मोड, लाइव फोटो, डुअल-व्यू शूटिंग, प्रो मोड आणि डॉक्यूमेंट स्कॅनिंग सारखे जबरदस्त फीचर्स देखील मिळणार आहेत. तसेच, स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
कंपनीच्या या नव्या फोनमध्ये 7900mAh बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दुसरे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी या डिव्हाईसमध्ये 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.