डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात 'या' 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित
सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे उकळण्यासाठी डिजिटल अरेस्टची सर्वात सामान्य पद्धत वारंवार वापरतात. यामध्ये हॅकर्स पोलीस किंवा अधिक बनून लोकांना खोटा कॉल करतात. यावेळी लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना अटक करण्याच्या धमक्या दिल्या जातात. यामुळे लोकं घाबरतात आणि सायबर गुन्हेगारांच्या बोलण्याला बळी पडतात. आतापर्यंत डिजीटल अरेस्टच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि काहीवेळेस तर लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरली जाणारी ही सर्वात सामान्य पद्धत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गृह मंत्रालयाची सायबर सिक्योरिटी एजेंसी I4C ने सांगितलं आहे की, फेक इन्वेस्टमेंट स्कॅमच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप, टेलीग्राम किंवा सोशल मीडिया ग्रुपमध्ये आधी तुम्हाला सहभागी करतात. यानंतर गुन्हेगार लोकांना इन्वेस्टमेंटच्या हाई प्रॉफिटचा सल्ला देतात. सुरुवातीला खोट्या इन्वेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर नागरिकांना छोटे – छोटे रिटर्न दिले जातात. मात्र जेव्हा मोठी रक्कम गुंतवली जाते, तेव्हा गुन्हेगार हे पैसे घेऊन गायब होतात.
इन्वेस्टमेंटव्यतिरिक्त डिलीवरी स्कॅम किंवा पार्सल स्कॅमच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. हॅकर्स आधी सायबर गुन्हेगारांना कॉल करतात आणि त्यांना सांगतात की, त्यांचं पार्सल आलं आहे आणि त्यामध्ये चुकीचे डॉक्यूमेंट्स, ड्रग्स इत्यादी आहे. स्कॅमर काहीवेळा पोलीस अधिकारी बनून देखील लोकांना फोन करतात आणि पैशांची मागणी करतात.
लोकांना काम देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते. वर्क फ्रॉम होमच्या खोट्या जॉब ऑफर लोकांना पाठवून त्यांचे डॉक्यूमेंट्स गोळा केले जातात. त्यानंतर लोकांना वेगवेगळे टास्क असाइन केले जातात. हेच टास्क पूर्ण करताना बँक अकाऊंट कधी रिकामं होतं याबाबत लोकांना समजत देखील नाही.
साइबर क्रिमिनल्स लोकांना सिम स्वॅप आणि कॉल फॉरवर्डिंगद्वारे आपल्या जाळ्यात अडकवतात. स्कॅमर टेलीकॉम कंपनीचे एजेंट बनून लोकांना फोन करतात आणि त्यांना सिम कार्ड बदलण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर स्कॅमर्स नवीन सिम जारी करण्यासाठी कागदपत्रांची मागणी करतात. वापरकर्त्याच्या कागदपत्रांचा वापर करून, हॅकर्स त्यांच्या फोनवरील सिम कार्ड सक्रिय करतात जेणेकरून ते यूजरच्या नंबरवर पाठवलेले ओटीपी आणि कॉल प्राप्त करू शकतील. यानंतर यूजरचं बँक अकाऊंट रिकामं केलं जातं.
स्कॅम आणि फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आणि मेसेजकडे दुर्लक्ष करा. कोणत्याही व्यक्तिसोबत तुमची माहिती शेअर करू नका. ओटीपी आणि पासवर्ड कोणालाही सांगू नका.






