
अरे देवा! 'या' Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का... बजेटवर होणार थेट परिणाम
टिप्स्टर देबायन रॉय (@Gadgetsdata) ने दावा केला आहे की, सॅमसंग गॅलेक्सी एम 17 5G च्या 4GB मॉडेलची किंमत 1 हजार रुपयांनी, 6GB मॉडेलची किंमत 2 हजार रुपयांनी आणि 8GB मॉडेलची किंमत 3 हजार रुपयांनी वाढवली आहे. तर गॅलेक्सी एफ 17 5G च्या 6GB मॉडेलची किंमत 1 हजार रुपयांनी आणि 8GB मॉडेलची किंमत 2 हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्स्टरने दावा केला आहे की, सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 ई 5G आणि गॅलेक्सी एम 17 ई 5G स्मार्टफोनच्या 4GB मॉडेलची किंमत 1 हजार रुपयांनी आणि 6GB मॉडेलची किंमत 2 हजार रुपयांनी वाढवली आहे. यामुळे आता या दोन्ही स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 17,499 रुपये झाली आहे. तर याची लाँच किंमत 13,999 रुपये होती. (फोटो सौजन्य: Samsung And Xiaomi)
After Vivo, iQOO, OPPO, OnePlus, Redmi & Poco Now, Xiaomi (pad), realme & Samsung hikes the prices of their smartphones by upto ₹4000‼️ Xiaomi Pad 8 price hiked by upto ₹3000 , now ,
• 8+128GB costs ₹38,999
• 12+256GB costs ₹43,999
• 12+256GB nano texture display… pic.twitter.com/4WWO5vfq6j — Debayan Roy (Gadgetsdata) (@Gadgetsdata) August 18, 2026
सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
भारतातील ‘शाओमी पॅड 8 ची ऑनलाइन लिस्टिंग अपडेट करण्यात आली असून, त्यात कंपनीच्या या फ्लॅगशिप टॅब्लेटची नवीन किंमत दर्शवण्यात आली आहे. या टॅब्लेटच्या 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपयांपासून सुरु होते. तर 12GB + 256GB रॅम आणि स्टोरेज असलेल्या टॉप एंड व्हेरिअंटची किंमत आता 43,999 रुपयांपासून सुरु होते. कंपनीने जूनमध्ये या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ केली होती. त्यावेळी 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये ठेवण्यात आली होती. यानंतर आता या व्हेरिंअंट्सच्या किंमतीत अनुक्रमे 3,000 रुपये आणि 5,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.