Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च

Samsung India Bespoke AI Appliances 2026: सॅमसंग इंडियाने २०२६ बिस्पोक एआय अप्लायन्सेसची नवी श्रेणी लॉन्च केली असून, AI आणि SmartThings प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घरातील विविध उपकरणांना एकमेकांशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 18, 2026 | 07:18 PM
Samsung India Bespoke AI Appliances

Samsung India Bespoke AI Appliances

Follow Us
Follow Us:
  • घरातील कामं होणार आणखी स्मार्ट
  • २०२६ Bespoke AI Appliances लाँच
  • पाहा खास फीचर्स
मुंबई: सॅमसंग इंडियाने आज आपल्या २०२६ बिस्पोक एआय अप्लायन्सेस लाइनअप लाँच केली, जी ग्राहकांचे जीवन अधिक समृद्ध आणि सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ‘द ब्रीफ गुरुग्राम’ या अत्याधुनिक अनुभवात्मक इव्हेण्टमध्ये सॅमसंगने दाखवून दिले की, एआय विविध उत्पादन श्रेणींमधील एक समान धागा म्हणून कार्य करतो, ज्यामध्ये स्मार्टथिंग्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सवयी शिकून घेणे, कामे स्वयंचलित करणे आणि ऊर्जेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असलेल्या परिसंस्थेत हवामान नियंत्रण, लाँड्री, लिव्हिंग रुम आणि किचन यांना एकत्र जोडले जाते. सर्वोत्तम टचस्क्रीन, प्रगत व्हॉइस इंटेलिजन्स आणि सर्वसमावेशक रचनेसह सुसज्ज असलेली २०२६ बिस्पोक एआय अप्लायन्सेस लाइनअप प्रत्येकासाठी कनेक्टेड, वापरण्यास सोपा आणि सुरक्षित स्मार्ट होम अनुभव प्रदान करते.

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग

“आमची २०२६ बिस्पोक एआय श्रेणी विविध जीवनशैली समजून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे ही श्रेणी प्रत्यक्ष जीवनातील सुविधा देणारा तुमचा ‘एआय होम कंपॅनियन’ बनेल. तंत्रज्ञान तुमच्या जीवनशैलीशी जुळवून घेईल असे ‘एआय होम’ तयार करणे हे सॅमसंगचे उद्दिष्ट आहे. घरे अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी बनवण्यासाठी आमचे बिस्पोक एआय अप्लायन्सेस एआय व्हिजन, सॅमसंग नॉक्स सोल्यूशन आणि सर्वसमावेशक रचनेसह येतात. भारतात आज विकले जाणारे सॅमसंगचे प्रत्येक दुसरे अप्लायन्स हे बिस्पोक एआय अप्लायन्स आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, आमच्या नवीन लाइनअपला ग्राहकांचे प्रेम आणि पाठबळ असेच मिळत राहील,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे प्रेसिडंट आणि सीईओ जेबी पार्क म्हणाले.

सॅमसंगच्या नव्या २०२६ बिस्पोक एआय होम अप्लायन्स लाइनअपमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनचा सुरेख संगम पाहायला मिळतो. यात समाविष्ट असलेल्या फॅमिली हब रेफ्रिजरेटरमध्ये गुगल जेमिनीद्वारे संचलित ‘एआय व्हिजन’ तंत्रज्ञान देण्यात आले असून, ते व्हिडिओ-टू-रेसिपी सारखे संदर्भाधारित एआय अनुभव प्रदान करते. यातील ३२-इंचाचा स्क्रीन नोट्स, वेळापत्रके आणि मनोरंजनासाठी घरातील मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करतो; तसेच यात फॅमिली केअर आणि पेट केअर यांसारख्या स्थानिक गरजांनुसार विशेष वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या श्रेणीतील बिस्पोक एआय विंडफ्री™ प्रो एअर कंडिशनर हा एक नेक्स्ट-जनरेशन प्लॅटफॉर्म आहे, जो एआय-सक्षम नियंत्रणांसह उत्कृष्ट हवेच्या गुणवत्तेसाठी पीएम १.० प्युरिफिकेशन सुविधा देतो. यात स्मार्टथिंग्स आणि होम अप्लायन्स रिमोट मॅनेजमेंट (एचआरएम) द्वारे गरजेनुसार विस्तार करता येण्याजोगे हवामान व्यवस्थापन सहज शक्य होते.

तसेच, आधुनिक लिव्हिंग स्पेसेससाठी डिझाइन केलेला इन्फिनिट १-वे कॅसेट एसी (विंडफ्री™ सह) ९ लाइट मोड्ससह आकर्षक एज लाइटिंगसह येतो. याचा विंडफ्री™ कूलिंग सिस्टम १७,२०० मायक्रो-होल्सद्वारे थेट अंगावर गार वारा न टाकता खोली प्रभावीपणे थंड करतो. केवळ १३.८ सेमी डेप्थचे अल्ट्रा स्लिम प्रोफाइल असलेला हा एसी टिकाऊ एएसए (अॅक्रिलोनायट्रिल स्टायरीन अॅक्रिलेट) मटेरियलपासून बनवला गेला आहे. याशिवाय स्मार्टथिंग्स नियंत्रण, एआय कम्फर्ट मोड आणि इंटरटेक प्रमाणित अँटीबॅक्टेरियल कॉपर फिल्टर यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये या एसीला अधिक कार्यक्षम बनवतात.

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Web Title: Samsung bespoke ai appliances 2026 india launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग
1

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार
2

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार

Online Shopping Safety Tips:  एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी
3

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड
4

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.