सॅमसंगची स्मार्ट मॉनिटर सिरीज खरेदी करण्याची सुवर्णसंधी! कंपनीने सादर केल्या आकर्षक लाँच ऑफर्स, जाणून घ्या सविस्तर
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने त्यांची नवीन स्मार्ट मॉनिटर लाइनअप लाँच केली आहे. ज्यामध्ये एम९, एम८ आणि एम७ यांचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे कंपनी त्यांच्या ग्राहकांना या सिरीजच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत नवीन सॅमसंग स्मार्ट मॉनिटर लाइनअप खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ७ जुलै ते २० जुलै २०२५ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी कंपनी नवीन स्मार्ट मॉनिटर लाइनअपच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स देत आहेत.
ग्राहक ७ जुलै ते २० जुलै २०२५ या कालावधीदरम्यान जवळपास ३,००० रूपयांच्या त्वरित बचतींचा आनंद घेऊ शकतात. लाइनअपमध्ये प्रमुख ४के क्यूडी-ओएलईडी मॉनिटर एम९ सह अपग्रेडेड एम८ आणि एम७ मॉडेल्स आहेत. हे सर्व मॉनिटर्स प्रगत व वैयक्तिकृत एआय क्षमतांसह सुसज्ज आहेत, तसेच सर्वोत्तम डिस्प्लेसाठी नवीन मानक स्थापित करतात. या नाविन्यतांसह युजर्स एकाच स्मार्ट डिवाईसवर मनोरंजनाचा, काम करण्याचा आणि गेम्स खेळण्याचा आनंद घेऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्ट मॉनिटर एम९ मध्ये क्यूडी-ओएलईडी तंत्रज्ञानासह आकर्षक ३२-इंच ४के डिस्प्ले आहे, जो प्रत्येक टास्कदरम्यान प्रगत रंगसंगती आणि कॉन्ट्रास्ट देतो. काम, गेमिंग व स्ट्रीमिंगसाठी डिझाइन करण्यात आलेला हा मॉनिटर टिकाऊपणाची खात्री देतो, तसेच बर्न-इन प्रोटेक्शन आणि अॅण्टी-ग्लेअर तंत्रज्ञान अशा वैशिष्ट्यांसह वापरकर्त्यांच्या आरामदायीपणाला प्राधान्य देतो. दिलेल्या कालावधीदरम्यान सॅमसंग एम९ सिरीज (किंमत १२१,४९९ रूपयांपासून सुरू) ३,००० रूपयांच्या लाँच ऑफरसह उपलब्ध असेल.
४के अपस्केलिंग, वॉईस अॅम्प्लीफिकेशन व पिक्चर ऑप्टिमायझेशन अशा बिल्ट-इन एआय-पॉवर्ड स्मार्ट वैशिष्ट्यांसह एम९ रिअल टाइमशी जुळून जात आवाज व पिक्चरचा दर्जा वाढवतो. मॉनिटर स्मार्ट एंटरटेन्मेंट हब म्हणून देखील कार्य करतो, एकीकृत स्ट्रीमिंग सेवा आणि जलद क्लाऊड गेमिंग क्षमता देतो, ज्याला १६५ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि अत्यंत कमी प्रतिसाद वेळ मदत करतो.
सुधारित स्मार्ट मॉनिटर एम८ आणि एम७ मॉडेल्स ३२-इंच ४के यूएचडी स्क्रिन्ससह सॅमसंगची लाइनअप वाढवतात, जेथे अधिकाधिक वापरकर्त्यांना सुधारित अनुभव देतात. दोन्ही मॉनिटर्समध्ये व्हीए पॅनेल्स आहेत, जे व्हिज्युअल दर्जा सुधारतात. या मॉनिटर्समध्ये क्लिक टू सर्च आणि टायझेन ओएस होम यासारखी एआय-पॉवर्ड वैशिष्ट्ये आहे, जी वापरकर्त्यांना एक्स्प्लोअर, नेव्हिगेट करण्यास आणि त्यांच्या पसंतीनुसार कन्टेन्ट सहजपणे शोधण्यास मदत करतात.
एम७ सिरीजचे तिन्ही मॉडेल्स (किंमत ३२,९९९ रूपयांपासून सुरू) १,५०० रूपयांच्या लाँच ऑफरसह उपलब्ध असतील आणि एम८ सिरीज (किंमत ४७,५९९ रूपयांपासून सुरू) ३,००० रूपयांच्या लाँच ऑफरसह उपलब्ध असेल. यासह किफायतशीरपणाबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांना लक्षवेधक पर्याय मिळतील. बिल्ट-इन मायक्रोसॉफ्ट ३६५ सह ग्राहक प्रत्यक्ष मॉनिटरमधील डॉक्युमेंट्सवर प्रभावीपणे काम करू शकतात, ज्यासाठी पीसीची गरज भासणार नाही. तसेच, वापरकर्ते मल्टी कंट्रोल, मल्टी व्ह्यू आणि स्मार्टथिंग्ज एकीकरणासह अधिक स्थिरता आणि मल्टीटास्किंग क्षमतांचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे हे मॉनिटर्स वैयक्तिक व व्यावसायिक वापरासाठी अनुकूल आहेत.