Tech Tips: फास्ट, रिवर्स, वायरलेस आणि बायपास चार्जिंगमध्ये नेमका फरक काय? 99 टक्के लोकांना माहीती नाही, जाणून घ्या सविस्तर
सध्याच्या डिजीटील काळात स्मार्टफोन केवळ कॉलिंग आणि मेसेजिंगसाठीच नाही तर इतर अनेक कामांसाठी वापरला जातो. स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही फोटोग्राफी करू शकता, व्हिडीओ बनवू शकता. याशिवाय स्मार्टफोनद्वारे पैसे कमावण्याचे देखील अनेक उपाय आहेत. खरं तर स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या आयुष्यात स्मार्टफोन जितका महत्त्वाचा आहे, तितकीच त्याची चार्जिंग टेक्नोलॉजी देखील महत्त्वाची आहे.
पूर्वी आपल्याला सतत आपला स्मार्टफोन चार्ज करावा लागत होता. मात्र आता असं नाही. बाजारात असे अनेक पावरफुल चार्जर उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने आपण अगदी काही क्षणात आपला स्मार्टफोन चार्ज करू शकतो आणि दिवसभर स्मार्टफोनचा वापर करू शकतो. बाजारात स्मार्टफोनच्या चार्जरचे विविध प्रकार उपलब्ध आहेत, ज्यामध्ये फास्ट, रिवर्स, वायरलेस आणि बायपास चार्जिंग यांचा समावेश आहे. पण यातील कोणता चार्जर आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि प्रत्येक चार्जरमध्ये नेमका फरक काय आहे, यासाठी अनेकांच्या मनात गोंधळ आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फास्ट चार्जिंग म्हणजेच कमी वेळात स्मार्टफोन चार्ज करण्याचे तंत्रज्ञान. आधी जेव्हा फोनला 100% चार्ज करण्यासाठी दीड ते 2 तासांचा कालावधी लागत होता, त्याच कामासाठी आता केवळ 30 ते 40 मिनिटे लागतात. पण यासाठी फोन आणि चार्जर दोन्हीमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. केबल देखील ओरिजिनल किंवा फास्ट चार्जिंग वाली असणं आवश्यक आहे.
रिवर्स चार्जिंग म्हणजेच तुमचा फोन पॉवर बँक बनतो आणि तुम्ही त्याद्वारे इतर कोणतेही डिव्हाइस चार्ज करू शकता. खरं तर हे तंत्रज्ञान खूप फायदेशीर ठरतं. Wired Reverse Charging आणि Wireless Reverse Charging असे या तंत्रज्ञानाचे दोन प्रकार आहेत. प्रवास करताना तुमच्या मित्राचा फोन बंद पडला तर अशावेळी तुम्ही तुमच्या फोनच्या मदतीने मित्राचा फोन चार्ज करू शतता. याशिवाय हे तंत्रज्ञान स्मार्टवॉच, इअरबड्स सारख्या गोष्टी चार्ज करण्यासाठी देखील मदत करते.
वायरलेस चार्जिंगमध्ये चार्जिंग पॅडवर फोन ठेवल्याने बॅटरी चार्ज होते. यासाठी कोणत्याही केबलची आवश्यकता नाही. यामुळे आता केबल अडकण्याचा आणि तुटण्याचा त्रास आता संपला आहे. ऑफिस किंवा बेडसाईड टेबलमध्ये ठेवण्यासाठी सोयीस्कर वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये चार्जिंग स्पीड थोडी कमी असते.
केवळ 3 स्टेप्स… काही क्षणातच तुम्ही अपलोड केलेला फोटो बनणार व्हिडीओ! Google Gemini करणार अनोखी जादू
गेमिंग करताना किंवा हेवी यूज दरम्यान फोन गरम होण्यापासून रोखण्यासाठी, बायपास चार्जिंग बॅटरी बायपास करून थेट प्रोसेसरला पॉवर देते. गेमिंग दरम्यान फोन लवकर गरम होत नाही, बॅटरी लाइफ वाढते आणि जास्त वेळ वापर करूनही कामगिरी चांगली राहते असे बायपास चार्जिंगचे अनोखे फायदे आहेत.