
Samsung Galaxy A07 5G: बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, 6000mAh बॅटरीने सुसज्ज! फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
Tech Tips: लॅपटॉप चार्जिंगला लावून कधीही करू नका ही कामं! नाहीतर होईल अनर्थ, तात्काळ बदला तुमची सवयी
Samsung Galaxy A07 5G हा स्मार्टफोन सध्या थायलँडमध्ये दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम+ 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम+ 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत THB 5,499 म्हणजेच सुमारे 15,800 रुपये आणि THB 5,999 म्हणजेच सुमारे 17,200 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक आणि लाइट वायलेट कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Galaxy A07 5G Official Specs 🔥 📐 6.7″ PLS LCD | 120 Hz | up to 800 nits
📸 50 MP+2 MP | 🤳 8 MP
⚙️ MediaTek Dimensity 6300
🔋 6000 mAh | ⚡️25W
💾 4/6 GB | 128 GB Storage + microSD
🔐 Side-fps | 5G
🖥️ One UI 8
🎨 Black, Light Violet#GalaxyA07 #Samsung pic.twitter.com/UWGpt9J1aT — Mohammed Khatri (@Mohammed_K_2010) January 13, 2026
Samsung Galaxy A07 5G मध्ये 6.7-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) PLS LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. स्क्रीनमध्ये वाटर ड्रॉप-स्टाइल डिस्प्ले नॉच आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा लावला आहे. हा स्मार्टफोन 6nm ऑक्टा-कोर चिपसेट, जसे मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्याला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्याच आले आहे. लिस्टिंगनुसार स्टोरेजला डेडिकेटेड स्लॉटसह माइक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन डुअल नॅनो-सिम कार्डला सपोर्ट करतो.
Galaxy A07 5G अँड्रॉईड 16 सह लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये Samsung चा One UI 8.0 टॉपवर आहे. दक्षिण कोरियाई टेक दिग्गजने पुष्टी केली आहे की, हँडसेटला सहा प्रमुख अँड्रॉइड व्हर्जन अपडेट्स आणि सहा वर्षांच्या सुरक्षा पॅचेस मिळतील. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Samsung Galaxy A07 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा प्राइमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर समाविष्ट आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे.
Samsung Galaxy A07 5G मध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी USB Type-C पोर्टद्वारे 25W पर्यंत वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इतर कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये 5G Sub-6, 4G LTE, Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.3 आणि GPS समाविष्ट आहे. फोनमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP54 रेटिंग आहे. Galaxy A07 5G मध्ये उजव्या बाजूला Samsung चा की आईसलँड डिझाईन आहे, जिथे पावर आणि वॉल्यूम बटन दिले आहे. पावर बटन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरचे देखील काम करतो.
Ans: Samsung ही दक्षिण कोरिया (South Korea) येथील बहुराष्ट्रीय कंपनी आहे.
Ans: होय. Samsung भारतात Make in India अंतर्गत अनेक स्मार्टफोन तयार करते. नोएडा येथे कंपनीची मोठी फॅक्टरी आहे.
Ans: सामान्यतः Samsung Galaxy Z Fold सीरिज मधील फोन सर्वात महाग असतात.