TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या
जेव्हा कोणी तुम्हाला स्क्रीनची साईज सांगतात तेव्हा खर तर तो आकडा म्हणजे डिस्प्लेची डायग्नल लेंग्थ असते. हा आकडा ना स्क्रीनची लांबी असते ना रुंदी. हा आकडा फोनचे डायग्नल म्हणजे एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यामधील अंतर दर्शवते. यामध्ये फोनचे कोपरे, आणि बेजल्स इत्यादींना समाविष्ट केलं जात नाही. हा आकडा म्हणजे फोनवर चमकणाऱ्या स्क्रीनचे डायग्नल लेंग्थ असते. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मॉल (6.2 इंच पर्यंत): हे फोन लहान असतात, ज्यांना एका हाताने सहज हँडल केले जाऊ शकते. हे खिशामधे अगदी व्यवस्थित फिट होतात. मात्र या फोनवर गेमिंग, वीडियो स्ट्रीमिंग आणि मल्टीटास्किंग करण थोड कठीण आहे.
मीडियम (6.3-6.5 इंच पर्यंत): यामधील पोर्टेबिलिटीसह उत्तम स्क्रीन स्पेस मिळतो. हे फोन पॉकेट फ्रेंडली असतात. हे फोन एका हाताने हँडल करणे कठीण आहे.
लार्ज (6.6-6.8 इंच पर्यंत): स्ट्रीमिंग आणि गेमिंगसाठी या साइजचे फोन योग्य निवड असते आणि यामध्ये इमर्सिव विजुअल्स मिळतात. हे फोन हातात व्यवस्थित पकडणे किंवा खिशात ठेवणे थोडे कठीण होते.
वेरी लार्ज (6.9 इंचपेक्षा मोठे): या स्मार्टफोन स्क्रीन मल्टीटास्किंग, गेमिंग आणि वीडियो स्ट्रीमिंगसाठी डिझाइन केल्या जातात. मोठ्या स्क्रीनमुळे हे स्मार्टफोन एका हाताने पकडणे आणि खिशात ठेवणे कठीण होते.
आता स्मार्टफोनसोबतच फोल्ड फोन देखील लाँच केले जात आहेत, त्यामुळे स्क्रीन साइजमध्ये आणखी एक नवीन कॅटेगरी जोडली जाणार आहे. फ्लिप फोनमध्ये स्क्रीन पूर्णपणे अनफोल्ड झाल्यानंतर त्याची साईज 6.7-6.9 इंचपर्यंत स्क्रीन आणि कवरवर सुमारे 4 इंचपर्यंत स्क्रीन मिळते. जर फोल्डेबल फोनबद्दल बोलायचं झालं तर मुख्य स्क्रीनची साईज 9-10 इंच पर्यंत आणि कवर स्क्रीन देखील 6.4 इंचपर्यंत असणार आहे.
केवळ स्क्रिनची साईज फोनच्या आकाराबद्दल माहिती देत नाही. स्क्रीन साइजव्यतिरिक्त आस्पेक्ट रेशो, बेजल्स आणि स्क्रीनचा आकार देखील महत्वाचा असतो.
आस्पेक्ट रेशिओ- हे स्क्रीनच्या रुंदी आणि उंचीमधील गुणोत्तर आहे जसे की 20:9 आणि 18:9 इत्यादी. सध्या 19.5:9 आणि 20:9 रेशिओ जास्त ट्रेंडमध्ये आहेत. यामुळे स्क्रॉलिंग अधिक सोपी झाली आहे आणि स्क्रीनवर जास्त टेक्स्टसाठी स्पेस उरतो. वाइडर रेशिओमध्ये स्प्लिट स्क्रीन अॅप्सचा वापर करणं आणि व्हिडीओ पाहणं सोपं होतं.
स्क्रीन टू बॉडी रेशिओ- यावरून फोनचा पुढचा भाग डिस्प्लेने किती व्यापला आहे हे कळते. जास्त स्क्रीन टू बॉडी रेशिओ म्हणजे यात पातळ बेझल आहेत आणि ते एक आकर्षक लूक देईल जर फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो कमी असेल तर त्याचा अर्थ असा की त्याचे बेझल जाड आहेत.






