OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष
चीनी टिपस्टरने डिजिटल चॅट स्टेशन आणि ओल्ड चेन एयरवर OnePlus 16 चे काही डिटेल्स शेअर केले आहेत. या लीक्सवर विश्वास ठेवला तर, आगीम OnePlus 16 ची बॅटरी, स्क्रीन, कॅमेरा आणि प्रोसेसर सर्वच अतिशय पावरफुल असणार आहे. लीक्समध्ये सांगितलं आहे की, OnePlus 16 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 दिला जाण्याची शक्यता आहे. प्रोसेसरचे नाव दुसरे काही असण्याची शक्यता आहे. पण OnePlus 16 मध्ये तगडा प्रोसेसर असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
लीक्सनुसार, आगामी वनप्लस 16 स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. हा फोन पेरिस्कोप टेलीफोटो लेंससह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. OnePlus 16 चा मुख्य कॅमेरा कसा असणार, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र अशी शक्यता आहे की, वनप्लस 16 मध्ये 200 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे दिले जाऊ शकतात.
इतर काही रिपोर्ट्समध्ये असा अंदाज वर्तवला आहे की, वनप्लस 16 मध्ये 200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह 50 मेगापिक्सेलचे दोन इतर सेंसर देखील दिले जाऊ शकतात. या स्मार्टफोनच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये एक इतर 2 मेगापिक्सेलचा मल्टीस्पेक्ट्रल लेंस दिला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. OnePlus 16 च्या आधी, कंपनी OPPO Find N6 मध्ये हा कॅमेरा मॉड्यूल वापरून पाहू शकते. पावर बॅकअपसाठी वनप्लस 16 मध्ये 9000mAh किंवा यापेक्षा मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. याला ग्लेशियर बॅटरी टेक्नोलॉजीसह सादर केले जाऊ शकते. आपण अपेक्षा करू शकतो की OnePlus 16 हा PCMark बॅटरी बेंचमार्क स्कोअर 19 तासांसह बाजारात येईल.
वनप्लस 15 स्मार्टफोनमध्ये 7300mAh बॅटरी देण्यात आली होती. तर आगामी स्मार्टफोन कंपनी आणखी पावरफुल बॅटरीसह लाँच करणार आहे. अपकमिंग OnePlus 16 मध्ये 200Hz रिफ्रेश रेटवाला डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. वनप्लस स्मार्टफोनवर देण्यात येणारा हा सर्वात जास्त रिफ्रेश रेट स्क्रीन असेल. हा सपाट पृष्ठभाग असलेला 2K डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे आणि त्यात अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील असू शकतो.






